दुबार नावाच्या मतदारांकडून निवडणूक अधिकाऱ्यांच्या कामांत अडथळा

नागरिकांना सहकार्य करण्याचे महापालिका प्रशासनाचे आवाहन


मुंबई : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५ च्या अनुषंगाने, प्रभाग प्रारुप मतदार यादीत एकापेक्षा अधिकवेळा असलेल्या दुबार (समान) नावांबाबत उपाययोजना करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. यासाठी संबंधित मतदाराशी प्रत्यक्ष घरोघरी (डोअर टू डोअर) संपर्क साधला जात आहे. या अानुषंगाने, संबंधित मतदारांच्या घरी, गृहनिर्माण संस्थांमध्ये येणारे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), निवडणूक कामकाजविषयक कर्मचारी-अधिकाऱ्यांना अशा मतदारांसह गृहनिर्माण सोसायट्यांकडून सहकार्य केले जात नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे निवडणूक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.


राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मतदार यादीमध्ये एकापेक्षा अधिकवेळा असलेल्या नावांसमोर ‘**’ (दोन तारे) अशी खूण करुन प्रभाग प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. तसेच, प्रारूप यादीतील एकापेक्षा अधिकवेळा असलेल्या दुबार (समान) नावांबाबत तपासणी करुन ती खरोखरच एकाच व्यक्तीची आहे किंवा वेगळ्या, यासाठी मतदाराचे नाव, लिंग, पत्ता व छायाचित्र यांची प्राथमिक तपासणी केली जात आहे. त्यात साम्य आढळल्यास संबंधित मतदाराशी संपर्क साधून आवश्यक माहिती घेतली जात आहे. तसेच, संबंधित मतदार प्रत्यक्षात एकच व्यक्ती असल्याची खात्री पटल्यानंतर ते नेमक्या कोणत्या केंद्रावर मतदान करणार आहेत, याबाबत त्यांच्याकडून विहित नमुन्यात अर्ज घेतला जात आहे. त्यानंतर संबंधितास इच्छेप्रमाणे मतदान करण्यासाठी प्रभागातील मतदान केंद्र निश्चित करून देण्यात येणार आहे.


ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्याच्या अानुषंगाने, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), निवडणूक कामकाजविषयक नेमलेले कर्मचारी-अधिकारी हे संबंधित मतदारांशी प्रत्यक्ष घरोघरी (डोअर टू डोअर) जाऊन संपर्क साधत आहे. त्यामुळे, काही व्यक्तीं, गृहनिर्माण संस्थांकडून या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सहकार्य केले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे, प्रभाग प्रारुप मतदार यादीतील एकापेक्षा अधिकवेळा असलेल्या दुबार (समान) नावांच्या पडताळणीसाठी आपल्या घरी, गृहनिर्माण संस्थांमध्ये येणाऱ्या निवडणूक कामकाजविषयक अधिकारी-कर्मचारी यांना सहकार्य करावे. यासंदंर्भात संबंधित गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष आणि सचिव यांना प्रशासनाकडून लवकरच पत्र जारी करण्यात येईल, असेही प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी