मुंबईतील १६ भूखंडांचा ई लिलाव होणार

शाळा, रुग्णालय आणि इतर सुविधांसाठी राखीव भूखंडांचा समावेश


मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने नुकतीच मुंबईतील विविध ठिकाणच्या ८४ भूखंडांच्या ई लिलावासाठी नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीला सुरुवात केली. यापाठोपाठ मुंबईतील विविध वापरासाठी राखीव असलेल्या १६ भूखंडांचा ई लिलाव करण्याचा निर्णय मुंबई मंडळाने घेतला असून त्याबाबतच्या जाहिरातीच्या तयारीला वेग देण्यात आला आहे. येत्या १५ दिवसांत यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे. शाळा, रुग्णालय आणि इतर सुविधांसाठी राखीव भूखंडांचा यात समावेश आहे. या भूखंड विक्रीतून मंडळाला कोट्यवधी रुपयांच्या महसुलाची अपेक्षा आहे.


म्हाडाच्या मालकीच्या भूखंडांपैकी काही भूखंड विविध सुविधा वापरासाठी राखीव आहेत. या भूखंडांचा त्याच कारणासाठी वापर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार त्या त्या मंडळाकडून असे भूखंड ई लिलावाद्वारे ८०-९० वर्षांसाठी भाडेतत्वावर दिले जातात. मुंबई मंडळाने अशा प्रकारच्या अनेक भूखंडांचा आतापर्यंत ई लिलाव केला. मंडळाने २०२४ मध्ये १७ भूखंडांच्या ई लिलावाची प्रक्रिया सुरू केली. काही कारणाने दोन भूखंड प्रक्रियेतून बाद करून १५ भूखंडांचा ई लिलाव करण्यात आला. या ई लिलावाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. १५ पैकी ५ भूखंड विकले गेले. १० भूखंडांना प्रतिसाद मिळाला नसला तरी जे पाच भूखंड विकले गेले त्यातूनच मुंबई मंडळाला २०० कोटी रुपये महसूल मिळाला.


पाचही भूखंडांना चांगली, अपेक्षेपेक्षा अधिक बोली लागल्याने मंडळाला चांगला महसूल मिळाला. आता मागील ई लिलावात रिक्त राहिलेल्या १० भूखंडांसह नवीन ६ भूखंड अशा एकूण १६ भूखंडांचा ई लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी म्हाडा उपाध्यक्षांकडे पाठविण्यात आल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली, तर दुसरीकडे ई लिलावाच्या जाहिरातीची आणि इतर प्रक्रियेची तयारी सुरू आहे. उपाध्यक्षांच्या मान्यतेनंतर जाहिरात प्रसिद्ध करून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती आणि बोली लावण्याच्या प्रक्रियेस सुरुवात केली जाणार आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत या प्रक्रियेस सुरुवात होण्याची शक्यता आहे.


मालवणी, कांदिवली, टागोरनगर (विक्रोळी), कन्नमवारनगर (विक्रोळी), जोगेश्वरी यासह अन्य ठिकाणच्या भूखंडांचा ई लिलावात समावेश असणार आहे. शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, मनोरंजन मैदाने अशा विविध वापरासाठी हे भूखंड आरक्षित असतील. २००० चौ. मीटरपासून ते ५००० चौ. मीटरच्या भूखंडांचा यात समावेश असण्याची शक्यता आहे. या भूखंडांची बोली किंमत लवकरच निश्चित केली जाणार आहे. ही किंमत निश्चित झाल्यानंतर मंडळाला या ई लिलावातून किती महसूल मिळणार हे स्पष्ट होईल, तर यावेळी भूखंडांच्या ई लिलावाला कसा प्रतिसाद मिळतो, सर्वच्या सर्व भूखंड विकले जातात का हे पाहणेही महत्त्वाचे आहे.

Comments
Add Comment

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून