मुंबईतील ४ हजार ५०० स्वयंसेविकांनी नाकारले निवडणुकीचे काम

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या कामासाठी प्रशासनाने सामुदायिक आरोग्य स्वयंसेविका (सीएचव्ही) आणि आशा सेविकांची बूथ स्तर अधिकारी (बीएलओ) म्हणून नियुक्ती केली. मात्र मुंबई महानगरपालिकेने सर्वोच्च न्यायालयामध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार सीएचव्ही व आशा सेविका महानगरपालिकेच्या कर्मचारी नाहीत. त्यामुळे त्यांना निवडणुकीचे काम बंधनकारक नाही, असा पवित्रा घेत मुंबईतील ४ हजार ५०० सेविकांनी बूथ स्तर अधिकारी म्हणून काम करण्यास थेट नकार दिला.


मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विविध आरोग्य सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यरत असलेल्या ४ हजार ५०० स्वयंसेविकांची बूथ स्तर अधिकारी म्हणून नियुक्ती केली. मात्र ⁠निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बीएलओ नेमणुकीसाठी दिलेल्या यादीमधील १३ संवर्गांमध्ये सीएचव्ही आणि आशा सेविकांचा समावेश नाही. त्या मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचारी नाहीत. त्याचबरोबर काही सीएचव्ही व आशा सेविका या राजकीय पक्षांशी संबंधित आहेत. त्यामुळे बीएलओ म्हणून नियुक्ती करणे अयोग्य असल्याचा दावा सीएचव्ही व आशा सेविकांनी केला आहे. मुंबई महानगरपालिकेने निवडणूक आयोगाला चुकीची माहिती देऊन सीएचव्ही व आशा सेविकांना बीएलओ म्हणून नेमणूक करून त्यांचा मानसिकदृष्ट्या छळ करीत आहेत. त्यामुळे ही नेमणूक बेकायदेशीर असून, सीएचव्ही व आशा सेविकांवर ती जबरदस्तीने लादण्यात येत आहे, असे सीएचव्ही व आशा सेविकांचे म्हणणे आहे. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना बीएलओसाठी नियुक्त करू नये असे निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेल्या अनेक सीएचव्ही व आशा सेविका या राजकीय पक्षांच्या कार्यकर्ता म्हणूनही काम करत असतात. त्यामुळे सीएचव्ही व आशा सेविकांची बीएलओ म्हणून नियुक्ती करणे म्हणजे निवडणूक आयोगाच्या मार्गर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेकडून मुंबई महानगरपालिका आयुक्त व मुख्य निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांना पत्र पाठवून सीएचव्ही व आशा सेविकांची जबरदस्तीने व बेकायदेशीरित्या करण्यात येणारी बीएलओची नेमणूक रद्द करावी, अशी विनंती केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या दुटप्पी भूमिकेमुळे सीएचव्ही व आशा सेविकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यांना आर्थिक, मानसिक त्रास दिला जात आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत कोणतीही अडचणी येऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी स्वत: यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी मुंबई मनपा आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रकाश देवदास यांनी पत्राद्वारे केली आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने