चार मिनिटांत ५२ वेळा सॉरी म्हणाला, तरी मुख्याध्यापकांचं दुर्लक्ष

आठवीतल्या मुलाकडून इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न


मध्य प्रदेश  : रतलाम येथील डोंगरे नगरस्थित बोधी इंटरनॅशल स्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. विद्यार्थ्याने उडी मारल्यानंतर शाळेतील कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेलं. तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला जवळच्याच एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं.


खासगी रुग्णालयात विद्यार्थ्याच्या एमआरआयसह इतर आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. या घटनेत विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अजूनही उपचार चालू आहेत. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पोलीस ठाण्याचे प्रभारी सत्येंद्र घनघोरिया रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांकडून सदर घटनेची माहिती घेतली.


नेमकी घटना काय?


शाळेचे संचालक राजेंद्र पितलिया यांनी सांगितलं की, “हा विद्यार्थी शाळेत मोबाईल घेऊन आला होता. वर्गात बसून त्याने एक रील तयार करून इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. प्राचार्यांना या रीलबाबत समजल्यावर त्यांनी विद्यार्थ्याच्या पालकांना शाळेत बोलावून घेतलं होतं. ही घटना घडली तेव्हा त्याचे पालक शाळेतच होते. विद्यार्थ्याने त्याच्या वडिलांना पाहिलं आणि तिसऱ्या मजल्याच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर त्याने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्याच्या पालकांच्या संपर्कात आहेत. विद्यार्थ्यावर अतिदक्षता विभागात उपचार केले जात आहेत.


शाळेमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. मुख्याध्यापकांच्या कक्षात विद्यार्थी माफी मागत असल्याचं दिसत आहे. त्याने चार मिनिटात तब्बल ५२ वेळा मुख्याध्यापकांची माफी मागितली. त्यानंतर तो तिथून शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्याकडे धावू लागला. दुसऱ्या एका सीसीटीव्ही फूटेजमध्ये त्याने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतल्याचं दिसत आहे. विद्यार्थ्याचे वडील म्हणाले, “मला शाळेत बोलावण्यात आलं होतं. परंतु, मला का बोलावलं होतं ते माहिती नव्हतं. माझा मुलगा राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत खेळणार होता. त्यासंबंधी काही कामानिमित्त मला बोलावलं असेल असं समजून मी गेलो होतो.

Comments
Add Comment

Saudi Arabia Flight Update : सौदी अरेबियासाठी विमानसेवा रद्द! IndiGo आणि Akasa Air चा मोठा निर्णय; प्रवाशांनी लक्ष द्या

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणाव आणि सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, इंडिगो आणि अकासा एअर या

Weather Alert: हवामानाचा मोठा इशारा! उद्या 16 राज्यांत पावसाचा रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

देश: हवामान विभागाने पुन्हा एकदा 16 राज्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 17

Palm Jaggery Export : भारताच्या सेंद्रिय पामिरा गुळाची बल्गेरियाला पहिली निर्यात; 1.755 टनांची खेप रवाना

नवी दिल्ली : भारताच्या पारंपरिक आणि पौष्टिक अन्नपदार्थांनी आता जागतिक पातळीवर आपली पाळेमुळे घट्ट करण्यास

Supreme Court Jobs: 10वी- 12वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी, सर्वोच्च न्यायालयात बंपर भरती; साठ हजारांहून अधिक असेल पगार

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टामध्ये तरूणांना नोकरी करण्याची संधी आहे. वेगवेगळ्या रिक्त पदांसाठी सुप्रीम

75 टक्के स्वदेशी तंत्रज्ञान! INS समर्थक भारतीय नौदलात दाखल, काय आहेत क्षमता?

नवी दिल्ली : भारतीय सागरी सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलत भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘आयएनएस

सायबर सिक्युरिटीमध्ये करिअरची संधी? NISM चे 2 नवीन कोर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई : आर्थिक आणि तांत्रिक सुरक्षेला बळ देण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्सने (एनआयएसएम) एक