Aequs IPO Day 1: Aequs आयपीओचा 'जलवा' पहिल्या दिवशी काही तासांत संपूर्ण आयपीओ सबस्क्राईब

मोहित सोमण: ९२१ कोटींच्या एईक्वियस लिमिटेड (Aequs Limited IPO) आयपीओसाठी आज सुरूवात झाली आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या दिवशीच कंपनीचा आयपीओ संपूर्णपणे सबस्क्राईब झाला आहे. कंपनीच्या मजबूत फंडामेंटलमुळे व आगामी विकसित घोडदौडीला कौल देत गुंतवणूकदारांनी कंपनीच्या भविष्यावर शिक्कामोर्तब या निमित्ताने केले आहे. आज पहिल्याच दिवशी ४.२० कोटी शेअर्स तुलनेत ५.१४ कोटी शेअर्सचे बिडिग (Bidding) झाले असल्याची माहिती पुढे आली. एनएसईवरील अधिकृत आकडेवारीनुसार, एकूण ४.२० शेअरसाठी ५.१४ कोटी लोकांनी बोली लावली होती. तसेच दुपारी १.१७ वाजेपर्यंत एकूण कंपनीच्या आयपीओला १.७३ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून अद्याप सबस्क्रिप्शन मिळाले नसले तरी किरकोळ घरगुती (Retail Investors) गुंतवणूकदारांकडून कंपनीच्या आयपीओला ७.०३ पटीने व विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून १.५९ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे.


हा आयपीओ आज ३ डिसेंबरपासून ते ५ डिसेंबर पर्यंत बाजारात गुंतवणूकदारांसाठी दाखल झाला आहे. ८ डिसेंबरपर्यंत पात्र गुंतवणूकदारांची निश्चिती होणार असून बीएसई व एनएसईवर १० डिसेंबरला शेअर बाजारात सूचीबद्ध (Listed) होणार आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १४४७० रूपये गुंतवणूक अनिवार्य करण्यात आली होती. कंपनीने प्राईज बँड ११८ ते १२४ रूपये प्रति शेअर निश्चित केला होता तर कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी ११ रुपये प्रति शेअर सवलत आयपीओसाठी देण्यात आली होती. अँकर गुंतवणूकदारांकडून कंपनीने कालच ४१३.९२ कोटींची उभारणी केली होती. तर ९२१.८१ कोटी बूक व्हॅल्यु असलेल्या आयपीओत ५.४० कोटी शेअर्सचा फ्रेश इशू असून उर्वरित २.०३ शेअर ऑफर फॉर सेल (OFS) असणार आहे.


कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर आगाऊ देय भरण्यासाठी, थकबाकी चुकती करण्यासाठी, इतर उपकंपनीत गुंतवणूकीसाठी, भांडवली खर्चासाठी ळ इतर मशिनरी खरेदीसाठी, व्यवसायिक वृद्धीसाठी करण्यात येणार आहे.


कंपनी प्रामुख्याने एरोस्पेस विभागासाठी लागणाऱ्या घटकांच्या निर्मितीमध्ये कार्यरत आहे. कंपनी ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, प्लास्टिक आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या निर्मितीमध्ये देखील गुंतलेली आहे. एरोस्पेस एक्व्स पूर्णपणे एकात्मिक एरोस्पेस उत्पादन क्षमतांसह एकाच एसईझेडमध्ये (Special Economic Zone SEZ) मध्ये कार्यरत असणारी वस्तूंची निर्मिती करणारी कंपनी आहे. कंपनी इंजिन सिस्टम, लँडिंग सिस्टम, कार्गो आणि इंटीरियर, स्ट्रक्चर्स, असेंब्ली आणि टर्निंगसाठी लागणारे घटक पुरवते.


आर्थिक बाजू पाहिल्यास, कंपनीच्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर ३% वाढ झाली असून करोत्तर नफ्यात (PAT) इयर ऑन इयर बेसिसवर ६१९% घसरण झाली आहे. कंपनीच्या उत्पन्नात तिमाही बेसिसवर मार्च तिमाहीतील ९५९.२१ कोटी तुलनेत सप्टेंबर महिन्यात ५६५.५५ कोटींवर घसरण झाली आहे.तर ईबीटा EBITDA (करपूर्व कमाई) तिमाही बेसिसवर मार्च तिमाहीतील १०७.९७ कोटींच्या तुलनेत सप्टेंबर तिमाहीत ८४.११ कोटींवर घसरला आहे. कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation). ८३१६.०६ कोटी रूपये आहे.

Comments
Add Comment

Rajya Natya Spardha : राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांना २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धांना

Gold Silver Rate Today : सोनं-चांदीच्या दरात पुन्हा घसरण ! ऐन सणासुदीच्या काळात ग्राहकांना दिलासा

Gold Silver Rate Today : सोनं आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जळगावच्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पर्धकांवर उधळली स्तुतीसुमनं! बेबी बॉस वैभव सूर्यवंशीची अशी होती रिॲक्शन Video

एशियन गेम्स 2026 स्पर्धेत भारताने आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. या स्पर्धेत भारताने एकूण 85 पदकं मिळवून चौथं

Ranbali Movie Review : कागदावर धमाकेदार, पण पडद्यावर फिका? 'रणबाली' चित्रपट कसा आहे ?

साऊथचा लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडाच्या (Vijay Devarkonda) बाबतीत एकच गोष्ट वारंवार घडताना दिसते. त्याच्या एखाद्या

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

IND vs WI 5th T20I: बंगळुरूत तीन बदल केले तरच टीम इंडियाचं विजयाचं गणित सुटणार! समजून घ्या

भारत आणि वेस्ट इंडिज टी20 मालिका आता रंगतदार वळणावर आहे. कारण वेस्ट इंडिजने भारतीय संघाला या मालिकेत तोडीस तोड