धक्कादायक! सौंदर्याच्या ईर्ष्येतून तरुणीने केली चार लहानग्यांची हत्या, विकृत मानसिकतेमुळे पोटच्या मुलीचाही केला नाही विचार

पानीपत: हरियाणातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.या प्रकरणात एका महिलेने केलेली कृती ऐकताच जगात किती प्रमाणात क्रुरता वाढली आहे याची जाणीव होते. आपल्या सौंदर्याबद्दलची टोकाची ईर्ष्या आणि असुरक्षितता यातून हरियाणातील एका महिलेने गेल्या दोन वर्षांत तब्बल चार निष्पाप मुलांची हत्या केली आहे. महिलेच्या या मानसिकतेने क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्याचे दिसून येते.



हरियाणातील पानीपत शहराचे एसपी भूपेंद्र सिंग यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, आरोपी महिलेची विचारसरणी 'Psycho killer' प्रकारची आहे. या महिलेला सुंदर दिसणाऱ्या लहान मुलींचा तिरस्कार होता आणि भविष्यात कोणतीही मुलगी आपल्यापेक्षा अधिक सुंदर दिसू नये, या भीतीने तिने ही टोकाची भूमिका घेत चार निष्पाप मुलांचा बळी घेतला आहे. या महिलेला पोलिसांनी अटक केली असून तिचा खोल तपास सुरू आहे.


अटक करण्यात आलेल्या पूनम नावाच्या या महिलेने सुरुवातीला आपल्या नातेवाईकांमधील आणि कुटुंबातील सुंदर दिसणाऱ्या मुलींना लक्ष्य केले. २०२३ मध्ये तिने आपल्या नणंदेच्या मुलीची आणि भाच्याची हत्या केली होती. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे कोणालाही संशय येऊ नये म्हणून, तिने नंतर स्वतःच्या एका लहान मुलालाही मारून टाकले. तिच्या मनात सौंदर्याच्या व्याख्येबाबत एवढी ईर्ष्या होती की, तिने पोटच्या मुलीचा जीव घ्यायला ही विचार केला नाही.




पाणीपतच्या सिवाह गावामध्ये ऑगस्ट २०२५ मध्ये पूनमने चौथ्या मुलाचा बळी घेतला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना, ६ वर्षांच्या मुलीचा पाण्याच्या टबमध्ये बुडून मृत्यू होणे ही गोष्ट पोलिसांना संशयास्पद वाटली. दुसरे म्हणजे, ज्या खोलीत मुलीचा मृत्यू झाला, त्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद होता. यावरून स्पष्ट झाले की, त्या मुलीची हत्या करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांच्या सखोल तपासात पूनमच्या हालचालींवरून तिच्यावरचा संशय दाट होत गेल्याने ती स्वत:च पोलिसांच्या जाळ्यात अडकली.


पूनमने चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितले की, तिची विचारसरणी अत्यंत विकृत आहे. आपण पकडले जाऊ नये किंवा आपल्यावर कोणाला संशय येऊ नये, यासाठी तिने आपल्या दोन मुलांपैकी एकाची हत्या केल्याचे तिने चौकशीमध्ये उघड केले. अशाप्रकारे गेल्या दोन वर्षांत, सोनीपतच्या भावड गावची रहिवासी असलेल्या पूनमने एकूण ४ लहान मुलांची हत्या केल्याचे समोर आल्याने समाजात एकच खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

Diamond AI system : भारताच्या सुरक्षेसाठी वापरणार 'डायमंड' एआय सर्व्हेलन्स तंत्रज्ञान

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाला नवी दिशा देण्याच्या

Supreme Court : नीट आंदोलकांवरील गुन्हे सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द; सीजेपीचे ५ सप्टेंबरचे आंदोलन रद्द

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आपल्या विशेष 'अनुच्छेद १४२' अंतर्गत अधिकारांचा वापर करत नीट २०२६

Tragic CNG Pump Accident : CNG भरताना होज फुटला, नोजल डोक्याला लागला; 24 वर्षीय पंप कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

जमशेदपूर : कारमध्ये CNG भरत असताना अचानक रिफ्युएलिंग होज फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात पेट्रोल पंपावरील 24

Tamil nadu crime news : तमिळनाडू हादरले! पाण्याच्या टाकीत आढळले महिलेचे छिन्नविच्छिन्न अवशेष; दागिन्यांच्या चोरीसाठी हत्येचा संशय

सेलम : तमिळनाडूतील सेलम (Taamilnadu Crime News) जिल्ह्यात एक अत्यंत भयानक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. घराच्या छतावर

IndiGo Emergency Landing : गोवा-दिल्ली इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग; इंजिनमध्ये बिघाड झाल्याने २२९ प्रवाशांचा जीव टांगणीला

गोवा : गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एयरलाइन्सच्या विमानाचे मंगळवारी सकाळी गोवा विमानतळावर तातडीने

Nepal green house miracle : नेपाळमधील महापुरात सर्वकाही वाहून गेले; पण ४० वर्षे जुने 'हिरवे घर' कसे टिकून राहिले ? घरमालकाने सांगितली आपवीती

काठमांडू : "जेव्हा तुम्हाला वाटतं की हे तुमच्या आयुष्याचे शेवटचे क्षण आहेत, तेव्हा डोक्यात काय विचार येऊ शकतात?