प्रभादेवीतील साई सुंदरनगर, कामगारनगरमधील नाल्यांचे बांधकाम होणार

नाल्याच्या रुंदीकरण कामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती


मुंबई : मुंबईतील प्रभादेवी येथील साई सुंदरनगर, कामगारनगर-२ व इतर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील अस्तित्वात असलेल्या पर्जन्य जलवाहिनीचे रुंदीकरण करून त्यांचे बांधकाम केले जाणार आहे. या नाल्याच्या रुंदीकरणाचे काम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात येत असून महापालिकेने यासाठी विकासक असलेल्या स्कायलार्क बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड केली आहे. या नाल्याचे रुंदीकरण करण्यासाठी तब्बल सुमारे ५० कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.


साई सुंदरनगर सहकारी गृहनिर्माण संस्था या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेस प्रथमतः १९९८ साली झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणामार्फत मंजुरी देण्यात आली होती. अंतिम भूभाग क्र १०७८ मधील एकूण १७२७४.२२ चौ.मी. एवढ्या क्षेत्रावरील भूभागावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना मंजूर केली.


ड्रेनेज आणि रस्त्याच्या संपूर्ण कामाचा खर्च ७५ टक्के महापालिका आणि २५ टक्के सोसायटी तथा कंत्राटदार या प्रमाणात वाटून घेतला जाईल आणि २५ टक्के महापालिकेने ठरवल्याप्रमाणे महापालिकेला आगाऊ ठेव म्हणून द्यावी असे निश्चित करण्यात आले होते. सन १९९८ साली मुळ मंजूर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये लगतच्या वेगवेगळ्या अनुक्रमे ९ गृहनिर्माण संस्था कालांतराने समाविष्ट करून मुळ झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे क्षेत्र वेळोवेळी वाढविण्यात आले आहे. अलीकडेच कामगार नगर-२ व माहिम नगर विकास योजना क्र. ४ मधील अंतिम भूभाग क्र. १०७८ वरील शिव सम्राट गृहनिर्माण संस्था या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.


डॉ. ऍनी बेझंट रस्ता येथील सुमारे ८०० मी. लांबीच्या रस्त्याचे व नाल्याचे काम यात अंतर्भूत होते. राज्य शासनाच्या सन २००५ रोजीच्या अधिसूचनेमध्ये समाविष्ट असलेल्या नाल्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. तर नाल्याच्या कामासाठी एकूण खर्चाच्या ८४.२१ कोटीपैकी ६३.५५ कोटी रुपये एवढी रक्कम आजतागायत खर्च करण्यात आली आहे.


दरम्यान, कामगार नगर-२ या झोपडपट्टीतील अस्तित्वातील नाला वळवून शिवडी वरळी उन्नत मार्गाच्या खांब क्र. ८४ ते खांब क्र. ८८ यांच्या रेषेत करण्याची विनंती एमएमआरडीएला एसआरएच्या अधिकाऱ्यांनी केली होती. त्यानुसार अस्तित्वातील नाला वळवताना जुन्या नाल्याचे बांधकाम हे शिवडी वरळी उन्नत मार्गाच्या रेषेत करताना खांबाच्या पायाभोवती सुरक्षित अंतर ठेवून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.


नव्याने समाविष्ट कामगार नगर-२ मधील एसआरए प्रकल्पामध्ये सुमारे २००० झोपड्या बाधित असून त्यांना नवीन इमारतीमध्ये त्यांना सामावून घ्यायचे आहे. या झोपडी धारकांनी अस्तित्वात असलेल्या नाल्यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नाल्याची देखभाल आणि नाल्यातील गाळ काढणे शक्य होत नाही.


तसेच नाला धोकादायक स्थितीत असल्याने त्याची दुरुस्ती व पुर्नबांधणी करणे आवश्यक आहे. हा नाला हिंदमाता मार्केट व दादर पुर्वेकडील पावसाळी पाण्याचा विसर्ग होण्यासाठी महत्वाचा आहे. त्यामुळे या नाल्यावरील अतिक्रमण हटवून त्यांचे रुंदीकरण करण्यासाठी महापालिकेने संबंधित कंत्राटदारांचीच निवड करून त्यांच्यामार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे. या नाल्याच्या रुंदीकरणासाठी सुमारे ४९.३५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.