फलटणच्या डॉक्टर महिला प्रकरणात सभागृहात मोठा खुलासा! मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना उत्तर

नागपूर: मागील काही महिन्यांपूर्वी फलटणच्या महिला डॉक्टर प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ उडवली होती. या प्रकरणावर विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार आणि काँग्रेस आमदार ज्योती गायकवाड यांनी डॉक्टरवर दबाव टाकला जात होता का? फलटणच्या महिला डॉक्टर प्रकरणातील आरोपींवर मकोका लागणार का? आरोपींची तात्काळ आणि सक्तीने चौकशी होणार का? महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा व्यवस्था उभी केली जाणार का? असे अनेक प्रश्न विचारले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.


आपण या महिलेच्या बाबतीत ६० दिवसात चार्जशीट दाखल करणार आहोत. सदर महिला डॉक्टर या ११ महिन्याच्या कंत्राटी पद्धतीने रुजू होत्या. फॉरेन्सिकच्या रिपोर्टनुसार डॉक्टर महिलेनेच हातावर सुसाईड नोट लिहिली होती. आरोपी बदनेने डॉक्टर महिलेला लग्नाचे अमिष दाखवून तिचे शारिरीक शोषण केले होते. शोषण झाल्यावर बदनेने वेगळी भूमिका घेतली, अशी धक्कादायक माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात दिली.



तसेच या प्रकरणात जेवढी नावं घेण्यात आली तेवढ्या सगळ्यांची चौकशी करण्यात आली आहे. काही लोकांनी या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक गोष्टीत राजकारण चालत नाही. या प्रकरणात पारदर्शी पद्धतीने चौकशी झाली. कुणालाही सोडले गेले नसून सर्वांची चौकशी होईल. पोलिसांकडे महिलेचे हॉटेलवर जाईपर्यंतचे सर्व सीसीटीव्ही आहेत. फॉरेन्सिक पुरावे जमा केले आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.


दरम्यान, दुसऱ्या आरोपीने देखील शोषण केले होते. त्यामुळे डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे, असे फडणवीस म्हणाले. या प्रकरणात दुसरी कोणतीही बाजू नाही. कारण महिलेने आत्महत्याच केली होती, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. दरम्यान सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी यावेळी मृत महिलेच्या कुटुंबीयातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी पीडित कुटुंबीयांना योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

Comments
Add Comment

Dagdusheth Halwai Ganpati : कारगिल, जम्मू, अयोध्या, राजस्थानसह सीमावर्ती भागात ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची (Dagdusheth Halwai Ganpati) भक्ती देशाच्या सीमेवर

MahaBhumi Stack : आता एका क्लिकवर मिळणार जमीन सर्च रिपोर्ट! महाराष्ट्रात महाभूमी स्टॅकचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘महाभूमी स्टॅक’ ही

Dr Sampada Munde Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी छाननी समिती स्थापन

मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.