विठुनामाच्या जयघोषाने मुंबापुरी दुमदुमणार

मुंबई : वारकरी संप्रदायाच्या वैचारिक ऐश्वर्याचे दर्शन मुंबईकरांना घडावे यासाठी गेली २६ वर्ष सुरू असणारा पांडुरंगाचा पालखी सोहळा यावर्षी ४ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. राम मंदिर ते वडाळा विठ्ठल मंदिर या दरम्यान होणा-या या पालखी सोहळ्याच्या आयोजनाची बैठक श्री वारकरी प्रबोधन महा समितीचे अध्यक्ष रामेश्वर महाराज शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी राम मंदिर कॉटन ग्रीन येथे पार पडली.

श्री वारकरी प्रबोधन समितीच्या वतीने पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते. आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्यादरम्यान जे उपक्रम होतात ते सर्व उपक्रम या पालखी सोहळ्यात होतात. ज्यांना आषाढी वारीमध्ये सहभागी होता येत नाही ते सर्व वारकरी मुंबईतील पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात. सात दिवस कीर्तन महोत्सव, संत संमेलन, घोड्याचे गोल रिंगण आणि पालखी सोहळा असे या संमेलनाचे स्वरूप असते.

यावर्षी होणा-या कीर्तन महोत्सवात दिपाली झुमके (कल्याण),महादेव महाराज मोरे (घाटकोपर), सुप्रिया साठे (आळंदी), केशव महाराज भागडे (इगतपुरी), डॉ. विवेक महाराज चव्हाण (आळंदी), महेंद्र महाराज भगवान गडकर, रामेश्वर महाराज शास्त्री, सुजाता महाराज गोपाळे आदी कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत. या बैठकीला उपाध्यक्ष अशोक महाराज सूर्यवंशी, सचिव राजाराम उर्फ नाना निकम, सहसचिव शामसुंदर महाराज सोन्नर, खजिनदार बळवंत महाराज आवटे, विश्वस्त बाबासाहेब महाराज मिसाळ, दीपक शिंदे उपस्थित होते. या बैठकीमध्ये यावर्षीच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

पांडुरंगाच्या पालखी सोहळ्यात संत संमेलन होते. यावेळी वारकरी संप्रदायातील वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध वारकरी प्रबोधनकारांना वारकरी रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. तर वारकरी संप्रदायाची अविरत सेवा करणा-या ज्येष्ठ प्रबोधनकाराला हैबत बाबा वारकरी सेवा पुरस्काराने गौरविण्यात येते. तर दरवर्षी दिंडीमध्ये सहभागी होणा-या दिंड्यामधील तीन आदर्श दिंड्याना पुरस्कार दिला जातो. या सोहळ्यात दैनिक 'सामना'च्या वतीनेही समाजप्रबोधन पुरस्कार दिला जातो. त्यावरही या बैठकीत  चर्चा  झाली.
Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म