धीरेंद्र शास्त्री करणार भुतांवर पीएचडी ; भुतांवर उच्च शिक्षणाची दारे खुली ?

बागेश्वर धाम : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी उच्च शिक्षणाची इच्छा व्यक्त करत पीएचडी करण्याचा मानस जाहीर केला आहे. कोणत्या विषयावर संशोधन करणार, याबद्दल सध्या उत्सुकता वाढली असून या चर्चेला मोठी रंगत आली आहे.


काही दिवसांपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना धीरेंद्र शास्त्री यांनी सांगितले की ते नियमितपणे अभ्यास करत आहेत आणि पीएचडीसाठी तयारीही सुरू आहे. यावेळी पीएचडीच्या विषयाबाबत विचारले असता त्यांनी विनोदात, भूताखेतांवर आधारित विषयाचा गंभीर अभ्यास करण्याचा विचार करत असल्याचे सांगितले.


जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये भुतांवर संशोधन केले जाते आणि काही संशोधकांनी या विषयावर पीएचडीही केली आहे. ऑक्सफर्डसारख्या नामांकित विद्यापीठातही अलौकिक घटनांवर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. भविष्यात या विषयावर बाहेरील विद्यापीठात अर्ज करण्याची इच्छा असल्याचे बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले.


सध्या त्यांनी कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेतलेला नसला तरी भुतांवर आधारित संशोधनाचा त्यांचा इरादा स्पष्ट दिसतो. अलौकिक विषयांवरील अभ्यास नवा नाही. एडिनबर्ग विद्यापीठ गेल्या पाच दशकांपासून भूतविद्येसंबंधी अभ्यासक्रम राबवत आहे. भारतातही काही शिक्षणसंस्था असे कोर्स चालवतात. थॉमस फ्रान्सिस विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठात आयुर्वेद शाखेत ‘भूत विद्ये’वर प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या या नव्या निर्णयामुळे भूतविद्या आणि अलौकिक संशोधनाविषयी नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

Comments
Add Comment

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम