देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन

लातूर : माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं वयाच्या ९० व्या वर्षी निधन झालं आहे.लातूरमधील त्यांच्या 'देवघर' या निवासस्थानी सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.मागील काही दिवसापासून ते आजारी होते. वाढत्या वयानुसार असलेल्या दीर्घ आजारपणामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. मागील अनेक वर्षांपासून राजकीय जीवनातून निवृत्त होते. राजकारणातील अत्यंत अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमा असलेले राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.


शिवराज पाटील चाकूरकर यांचा अल्प परिचय


शिवराज पाटील चाकूरकर... चाकूर गावातला साधा मुलगा ते अभ्यासू राजकारणी असा प्रवास... त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून विज्ञानाची पदवी आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतलं. त्यांनी १९६७ मध्ये लातूर नगरपालिकेतून राजकारणात पाऊल ठेवलं. पुढे १९८० ते १९९९ पर्यंत सलग सात वेळा लातूर लोकसभेचं प्रतिनिधित्व... इंदिरा गांधी, राजीव गांधींच्या मंत्रिमंडळात संरक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान, अवकाश अशा संवेदनशील खात्यांची धुरा सांभाळली.


नंतर १९९१ ते १९९६… लोकसभेचे सभापती म्हणून त्यांनी संसदेला आधुनिक रूप दिलं. संगणकीकरण, थेट प्रक्षेपण, नव्या ग्रंथालय इमारतीचं बांधकाम, संसदीय कामकाजात पारदर्शकता… हे सर्व त्यांचंच योगदान. इतकंच नव्हे तर देश-विदेशातील संसदीय परिषदांमध्ये भारताचं प्रभावी नेतृत्व केलं. उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराची कल्पनाही त्यांचीच.


यानंतर २००४ मधील निवडणुकीत पराभव झाला. तरीही सोनिया गांधींनी त्यांच्यावर विश्वास टाकत गृहमंत्रिपद दिलं. पण २००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर सुरक्षेतील त्रुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी राजीनामा दिला. नंतर पंजाबचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी अतिशय संयमानं काम केलं.


आजच्या राजकारणात जिथे स्वच्छ प्रतिमा दुर्मीळ झालीय, तिथे शिवराज पाटील चाकूरकर अपवाद होते. सत्य साईबाबांचे निष्ठावंत भक्त, लिंगायत समाजाचा अभिमान, कुटुंबवत्सल पिता आणि प्रेरणादायी मार्गदर्शक. लातूरच्या ‘देवघर’ निवासस्थानी आज सकाळी साडे सहा वाजता त्यांनी शांततेत देह ठेवला. पण त्यांचा वारसा, त्यांची शिकवण आणि त्यांचं स्वच्छ राजकारण मात्र कायम अमर राहील.

Comments
Add Comment

भूतकाळ आणि वर्तमानाचा रहस्यमय खेळ! ‘संडे १९९६’चा ट्रेलर प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे अभिनेते गणेश यादव, पंकज विष्णू आणि ओंकार राऊत

Hong Kong Sixes 2026 : कृणाल पांड्याकडे भारताची धुरा, 'हा' स्टार खेळाडू तब्बल 4 वर्षांनंतर थेट राष्ट्रीय संघात परतला!

हाँगकाँग सिक्सर्स 2026 (Hong Kong Sixes 2026) क्रिकेट स्पर्धेबाबत एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आगामी 30 ऑक्टोबर ते 1

Mumbai Apmc Market : सणासुदीच्या तोंडावर ड्रायफ्रूट्स महागले; मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये दरात २५ टक्क्यांपर्यंत वाढ

मुंबई : सणासुदीचा काळ जवळ येत असतानाच सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागण्यास सुरुवात झाली आहे. दिवाळी

मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयातील स्वयंपाकघराचा परवाना निलंबित, FDA ची कारवाई

अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (FDA) शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) मुलुंड येथील फोर्टिस रुग्नालयातील स्वयंपाक घराचा परवाना

Greater Noida News : ग्रेटर नोएडामध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; नूडल्स खाल्ल्याने फूड पॉइजनिंगचा प्राथमिक संशय!

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) ग्रेटर नोएडामधून (Greater Noida) एक अतिशय हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारी घटना

Nashik : नाशिक-पुणे महामार्गावरील बिटको चौकात महावितरणच्या कार्यालयाला आग, फर्निचर आणि कागदपत्रांचे नुकसान

Nashik : नाशिक-पुणे महामार्गावरील बिटको चौक परिसरात असलेल्या महावितरणच्या विभागीय कार्यालयाच्या इमारतीतील एका