इंडिगोच्या प्रवाशांना 'त्रास' मात्र गुंतवणूकदारांचा 'फाल्गुन मास'! ३१% रिटर्न्ससह का गुंतवणूकदार इंडिगो शेअर खरेदी करत आहेत? वाचा

मोहित सोमण: एकीकडे इंडिगो विमानांच्या रद्दीकरणाचा (Cancellation) फटका प्रवाशांना बसला होता ज्याचा फटका कंपनीच्या शेअरलाही बसला. मात्र किंमतीत झालेल्या घसरणीसह ब्रोकरेजने दिलेल्या सल्ल्यानुसार गुंतवणूकदार आपली खरेदी या शेअर्समध्ये वाढवत आहेत. ब्रोकरेज इंडिगो (Inter Globe Aviation) शेअर्समध्ये अपसाईड पाहत असल्याने मोठ्या प्रमाणात शेअर मध्ये गुंतवणूक गुंतवणूकदार करतील अशी अपेक्षा निर्माण झालेली आहे. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, शेअर्समध्ये ३० ते ३१% वर कमाईची आश्वासकता ब्रोकरेजने दिल्याने गुंतवणूकदार शेअर्समध्ये कमाईची संधी शोधत आहेत.


गेल्या काही दिवसांत कंपनीची हजारो विमाने रद्द झाल्याने लाखो प्रवाशांना या घटनेचा हकनाक फटका बसला. झालेल्या गैरसोयीसह वाढवलेल्या अव्वाच्या सव्वा किंमतीमुळे मोठ्या प्रमाणात विमान कंपनीवर टीका झाली‌. डीजीसीएने (Directorate General of Civil Aviation) व हवाई उड्डाण मंत्रालयाच्या नियमांची पायमल्ली केल्याने कंपनीच्या सीईओ पीटर इलिबर्स यांना काल चौकशीसाठी विभागाने बोलवले. दरम्यान अपुरे मनुष्यबळ असले तरी नियामकांना सांगितलेल्या माहितीनुसार, कंपनीने आपले मनुष्यबळ भरती सुरू केली असून काल गुरुवारपासून विमान सेवा पूर्ववत झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले. अशातच मोठ्या प्रमाणात शेअर्समध्ये घसरण झाली. गेल्या ७ ते ८ दिवसात कंपनीचा शेअर १८% कोसळला होता.तरीही तेव्हाही युबीएस ब्रोकरेजने कंपनीच्या नैसर्गिक वाढीवर (Natural Organic Growth) अबाधित राहणार असे म्हणत लक्ष्य किंमत (Target Price) ६३५० रूपयांवर कमी केले होते.


यापूर्वी एचएसबीसी सिक्युरिटीजने कंपनीच्या शेअर्समध्ये 'बाय' कॉल कायम ठेवला असून एचएसबीसीला वाटते की यामुळे कर्मचाऱ्यांचा खर्च ४५० दशलक्ष ते ९०० दशलक्ष पर्यंत वाढू शकतो, म्हणजेच यांच्या कर्मचाऱ्यांच्या खर्चात केवळ १% वाढ होईल. तसेच, इंडिगोची, विशेषतः आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत, काही तात्पुरती प्रतिष्ठा खराब होऊ शकली तरी हा प्रभाव तात्पुरता राहिल असे म्हटले होते. त्यांनी खरेदीचा सल्ला कायम ठेवला तरी ६९२० रूपयांवरून लक्ष्य किंमत ५९७७ रुपयांवर कमी केली होती.


नुकतेच आपल्या प्रसिद्ध केलेल्या अहवालात ब्रोकरेज फर्म यूबीएसने इंडिगोच्या भविष्यातील संभाव्यतेसाठी तीन परिस्थिती मांडल्या आहेत. व नव्या अपेडटनंतर स्टॉकवरील 'खरेदी' शिफारस आणि ६३५० रुपयांचे लक्ष्य कायम (Maintain Buy) कायम ठेवले आहे. त्यांच्या निष्कर्षानुसार कंपनीच्या शेअर्समध्ये गुरुवारच्या बंदपासून ३१% ची संभाव्य वाढ (Potential Growth) दर्शवते.


याविषयी बोलताना, 'इंडिगोची परिस्थिती सतत विकसित होत आहे, नियामकांकडून हिवाळ्यातील वेळापत्रक कमी करणे आणि इंडिगोच्या कार्यालयांमध्ये अधिकारी तैनात करणे यासारखे कठोर उपाय लागू करत आहे' यूबीएसने त्यांच्या नोटमध्ये म्हटले आहे. या परिस्थितीत, यूबीएस असे गृहीत धरते की सर्व आवश्यक पायलट, जे आर्थिक वर्ष २०२६ आणि २०२७ मध्ये जवळजवळ ९०० आहेत. नव्या अपडेटनुसार त्यांना नव्या नियमांचे पालन करण्यासाठी विद्यमान पायलटच्या सारख्या किमतीत आणि अनुपालनाच्या किंचित जास्त खर्चाने नियुक्त केले आहे.


यूबीएसने त्यांच्या बेस केसमध्ये असे म्हटले आहे की,'आवश्यक पायलटपैकी फक्त ७०% किंवा त्यापैकी सुमारे ६३० जणांना आर्थिक वर्ष २०२६ आणि २०२७ मध्ये विद्यमान पायलट खर्चापेक्षा ३% जास्त पगारावर नियुक्त केले आहे, तसेच अनुपालन खर्चात वाढ झाली आहे. आम्ही घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवत आहोत आणि सरकार आणि नियामक काय कारवाई करू शकतात यावर अवलंबून आमचे अंदाज पुनरावलोकनाच्या अधीन असू शकतात असे यूबीएसने त्यांच्या अहवालात म्हटले.


प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इंडिगोवर २६ विश्लेषकांचे कव्हरेज आहे, जिथे २१ जणांना 'खरेदी' रेटिंग दिले असून दोघांकडून 'होल्ड' रेटिंग आहे, तर तीन ब्रोकरेज कंपनीने स्टॉकवर 'विक्री 'रेटिंग दिले आहे. त्यामुळे या घडामोडीचाप्रवाशांना त्रास झाला असला तरी गुंतवणूकदारांना या शेअर्समध्ये कमावण्याची नामी संधी निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment

Hindi Exam : सरकारी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करणारा निर्णय रद्द

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी ‘हिंदी भाषा

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली