गेल्या आठवड्यात परकीय चलनसाठ्यात १.०३ अब्ज डॉलरने वाढ

प्रतिनिधी: परकीय चलन संकलनात (Forex Reserves) किरकोळ वाढ नोव्हेंबर महिन्यात झाली आहे. आरबीआयच्या नव्या 'विकली सॅस्टिटिक्स सफ्लिमेंट' या अहवालात वाढीचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अस्थिरतेच्या काळात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) दिलेल्या माहितीत परकीय चलनात एका आठवड्यात १.०३३ अब्ज डॉलरने वाढ झाली आहे. त्यामुळे ही किटी ६८७.२६० अब्ज डॉलरवर पोहोचली असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.


५ डिसेंबरपासून झालेल्या या नोंदणीत आरबीआयकडून सोन्याच्या साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रूपयांच्या स्थिरीकरणासाठी आरबीआय हे कार्य वेळोवेळी करते. या आठवड्यातही आरबीआयने सोने साठ्यात वाढ केली जी येणाऱ्या काळात ७०४.८९ अब्ज डॉलर या विक्रमी पातळीवर आगामी काळात पोहोचू शकते‌. सप्टेंबर २०२४ मध्ये ही पातळी गाठण्यास भारताला यश आले होते. आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीतील निर्णयानंतर आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी भारताकडे पुरेसा निधी असून पुढील ११ महिन्यात आयात देयी सहज चुकवता येतील इतका पुरेसा निधी असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले होते.


तसेच अहवालातील आणख्या माहितीनुसार, सोन्याच्या ठेवीत (Gold Reserves) गेल्या आठवड्यात १०६.९८४ अब्ज डॉलर पर्यंत वाढ झाली आहे. एकाच आठवड्यात या साठ्यात १.०३३ अब्ज डॉलरने वाढ झाल्याचे अहवाल सांगतो. गेल्या महिन्याभरात सोन्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात अस्थिरता निर्माण झाल्याने या किंमतीत मोठ्या प्रमाणात चढउतार पहायला मिळाले होते. त्यामुळे या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. आरबीआयच्या मते एकूणच परिस्थिती सकारात्मक असून परकीय चलनाबाबत भारत मजबूत स्थितीत असल्याचे स्पष्ट केले.


एकूणच यावर्षी ४७ ते ४८ अब्ज डॉलरची वाढ परकीय चलन साठ्यात झाली आहे. मात्र आर्थिक वर्ष २०२२ मधील ७१ अब्ज डॉलर तुलनेत आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ५८ अब्ज डॉलरवर चलनसाठा वाढीत घसरण झाली होती. वेळोवेळी सोन्याच्या साठ्यात वाढ करताना रूपयांचे अवमूल्यन (Devaluation) अस्थिरतेच्या काळात रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात डॉलरची विक्री केली जाते. तर स्थिर कालावधीत वेळप्रसंगी आरबीआय डॉलरही खरेदी करत असते.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण