वरळी सी लिंक वर २५० च्या स्पीडने पळवली लंबोर्गिनी; पोलिसांनी घडवली अद्दल

मुंबई : मुंबईतील वांद्रे–वरळी सी लिंकवर भरधाव वेगात आणि अत्यंत धोकादायक पद्धतीने लॅम्बोर्गिनी उरूस चालवण्याचा प्रकार उघडकीस आला असून, पोलिसांनी कोट्यवधी रुपयांची ही आलिशान कार जप्त केली आहे. वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करत स्टंटबाजी करण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत चालकाविरोधात गुन्हा दाखल केला.


बुधवारी घडलेल्या या घटनेत सी लिंकसारख्या महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या मार्गावर गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पिवळ्या रंगाची लॅम्बोर्गिनी इतर वाहनांना ओव्हरटेक करत भरधाव वेगात जाताना स्पष्टपणे दिसत आहे. या मार्गावर ताशी ८० किलोमीटरची वेगमर्यादा असताना, कार अत्यंत वेगाने चालवली जात असल्याचे व्हिडीओतून स्पष्ट झाले.


व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आणि कार चालवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवली. फैज अदनवाला (वय ३६) या मुंबईत खारमध्ये राहणाऱ्या कार डीलरने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे उघड झाले. प्राथमिक चौकशीत त्याने सोशल मीडियासाठी व्हिडीओ शूट करताना कार भरधाव चालवल्याची कबुली दिली.


वांद्रे–वरळी सी लिंकसारख्या महत्त्वाच्या पुलावर अशा प्रकारे बेदरकार वाहन चालवणे इतरांच्या जीवाला धोका निर्माण करू शकते, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.

Comments
Add Comment

मुंबईत दीड वर्षांच्या मुलीला सहाव्या मजल्यावरून ढकललं, आरोपीच्या आईनं पुरावे नष्ट करण्यासाठी वापरली शक्कल

मुंबई: मुंबईतल्या गोरेगाव पूर्वेतील दिंडोशी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोरेगाव पूर्वेतील

abvp protest mumbai university : ‘बांगलादेशसारख्या अराजकतेला भारतात थारा नको!’; संविधानाच्या रक्षणासाठी मुंबई विद्यापीठात अभाविपतर्फे भव्य स्वाक्षरी अभियान व निदर्शने

मुंबई : देशातील लोकशाही व्यवस्था मजबूत राखणे, भारतीय संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करणे आणि राष्ट्रीय एकात्मता

Virar News: विरारमध्ये ज्युनिअर आर्टिस्टची आत्महत्या, अश्लील व्हिडिओंच्या आधारे कोट्यवधींची खंडणी उकळल्याचा आरोप

विरार: अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी उकळल्याच्या प्रकाराला कंटाळून

Versova Beach Dead Body : वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गोणीत सापडला मृतदेह; 6 आरोपींना अटक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर 1 ऑक्टोबर रोजी गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु