तब्बल ९९तासांचा पाणी ब्लॉक मेट्रो लाइन ७च्या प्रकल्प कामासाठी जलवाहिनी वळवणार येत्या सोमवारी ते शुक्रवार शहर आणि पश्चिम उपनगरातील काही भागात असेल पाणीकपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : जी उत्तर, के पूर्व विभाग आणि एच पूर्व विभागातील मोठ्या आकाराच्या जलवाहिनी जोडणीचे काम हाती घेतले जाणार आहे. ही कार्यवाही सोमवार, २२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून शुक्रवार, २६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजेपर्यंत (एकूण ९९ तास) सुरु राहणार आहे. परिणामी, जी उत्तर, के पूर्व आणि एच पूर्व विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. तसेच, नियमित पाणीपुरवठ्याच्‍या वेळेतदेखील बदल होणार आहे, याची नागरिकांनी कृपया नोंद घ्‍यावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्‍या वतीने करण्‍यात येत आहे.


मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्‍या मेट्रो लाईन ७ अ प्रकल्पाच्या कामासाठी २४०० मिलीमीटर व्यासाच्या अपर वैतरणा मुख्य जलवाहिनीचा काही भाग वळविण्यात आला आहे. या वळविण्यात आलेल्या भागाचे छेद – जोडणी (क्रॉस – कनेक्शन) चे काम मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे. ही कार्यवाही अत्यंत महत्त्वाची असून नियोजनबद्ध पद्धतीने व तांत्रिक निकषांचे पालन करून करण्यात येणार आहे. या दरम्यान नागरिकांना पाणीपुरवठ्यात कमीतकमी अडथळा येईल, यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात आले आहे.


सोमवार, २२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून शुक्रवार, दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजेपर्यंत जलवाहिनी जोडणीची कामे सुरु राहणार आहेत. त्‍यामुळे जी उत्तर, के पूर्व आणि एच पूर्व विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.


जी उत्तर, के पूर्व व एच पूर्व विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. दुरुस्तीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस पाणी उकळून - गाळून प्‍यावे, महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.



१. ‘जी उत्तर’ विभाग :


(धारावी सकाळचा पाणीपुरवठा) - धारावी लूप मार्ग, ए. के. जी. नगर
धारावी सकाळचा पाणीपुरवठा - जस्मिन मील मार्ग, माटुंगा कामगार वसाहत, संत रोहिदास मार्ग, ६० फूट मार्ग, ९० फूट मार्ग, संत कक्कैया मार्ग, एम. पी. नगर ढोरवाडा, महात्मा गांधी मार्ग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ४.०० ते दुपारी १२.००) (सोमवार, दिनांक २२ डिसेंबर ते गुरुवार, दिनांक २५ डिसेंबर २०२५ दरम्यान दररोज सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा)


धारावी सायंकाळचा पाणीपुरवठा - धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदीर मार्ग, दिलीप कदम मार्ग, जस्मिन मील मार्ग, माहीम फाटक, ए. के. जी. नगर (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ४.०० ते रात्री ९.००) (सोमवार, दिनांक २२ डिसेंबर ते गुरुवार, दिनांक २५ डिसेंबर २०२५ दरम्यान दररोज सायंकाळी ५.०० ते रात्री १०.०० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा)*



२. ‘के पूर्व’ विभाग :


कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ क्षेत्र, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी ऍन्ड टी वसाहत (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी २.०० ते सायंकाळी ५.३०) (सोमवार, दिनांक २२ डिसेंबर ते गुरुवार, दिनांक २५ डिसेंबर २०२५ दरम्यान दररोज दुपारी २.०० ते सायंकाळी ५.३० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा)*


कोलडोंगरी, जुनी पोलीस गल्ली, विजय नगर (सहार रस्ता) मोगरापाडा (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ५.०० ते रात्री १०.००) (सोमवार, दिनांक २२ डिसेंबर ते गुरुवार, दिनांक २५ डिसेंबर २०२५ दरम्यान दररोज सायंकाळी ५.०० ते रात्री १०.०० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा)



३. ‘एच पूर्व’ विभाग :


वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) मोतिलाल नगरसह (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ रात्री १०.०० ते रात्री ११.४०) (सोमवार, दिनांक २२ डिसेंबर ते गुरुवार, दिनांक २५ डिसेंबर २०२५ दरम्यान दररोज रात्री १०.०० ते रात्री ११.४० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा)


प्रभात वसाहत, टीपीस-३, आग्रीपाडा, कलिना, सीएसटी मार्ग, हंसभुग्रा मार्ग, विद्यापीठ, सीएसटी मार्गाची दक्षिण बाजू, यशवंत नगर, सुंदर नगर, कोलिवरी गाव, तीन बंगला, शांतिलाल कंपाऊंड, पटेल कंपाऊंड, गोळीबार मार्ग, खार भुयारी मार्ग (सब वे) ते खेरवाडी, नवापाडा, बेहराम नगर, ए. के. मार्ग, शासकीय वसाहत वांद्रे (पूर्व) (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ मध्यरात्री ३.३० नंतर ते सकाळी ९.००) (मंगळवार, दिनांक २३ डिसेंबर ते गुरुवार, दिनांक २५ डिसेंबर २०२५ दरम्यान दररोज मध्यरात्री ३.३० नंतर ते सकाळी ९.०० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा)

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.