आता डॉक्टरांना ‘सुवाच्य अक्षरात’ लिहावी लागणार औषधांची नावे

एनएमसीचे वैद्यकीय महाविद्यालयांना कडक आदेश


मुंबई : डॉक्टरांचे औषधाच्या चिठ्ठीमधील अक्षर सर्वसामान्यांच्या समजण्यापलीकडे असते. रुग्ण, नातेवाईक व फार्मासिस्ट यांचा बऱ्याचदा गोंधळ उडतो. त्यामुळे औषधाच्या चिठ्ठीतील डॉक्टरांच्या हस्ताक्षरावर देखरेख ठेवण्याचा निर्णय राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने घेतला आहे. औषधाच्या चिठ्ठीसंदर्भातील नियम, नियामक व नैतिक मानकांचे पालन आणि निरीक्षण करण्यासाठी देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना औषध व उपचार समिती (ड्रग्स अँड थेरप्युटिक्स कमिटी – डीटीसी) अंतर्गत स्वतंत्र उपसमिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या २७ ऑगस्ट २०२५ च्या आदेशानुसार राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये, संस्थांच्या अभ्यासक्रमात औषधचिठ्ठी सुवाच्य आणि स्पष्ट हस्ताक्षरात असण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. तसेच औषधचिठ्ठी व वैद्यकीय दस्ताऐवजांची वाचनीयता हे भारतीय संविधानाच्या कलम २१ अंतर्गत आरोग्य हक्काचा एक आवश्यक घटक असल्याचे स्पष्ट केले आहे.


राष्ट्रीय वैद्यकीय आयोग कायदा, २०१९, भारतीय वैद्यकीय परिषद (व्यावसायिक आचरण, शिष्टाचार आणि नीतिमत्ता) नियम, २००२ आणि २१ सप्टेंबर २०१६ च्या अधिसूचनेतील तरतुदींचा संदर्भ दिला आहे. यामध्ये प्रत्येक वैद्यकीय व्यावसायिकाने औषधाची चिठ्ठी वाचनीय आणि शक्यतो मोठ्या अक्षरात लिहणे बंधनकारक आहे. वैद्यकीय कागदपत्रांमध्ये सुवाच्य आणि स्पष्टतेची आवश्यकता यावर भर देऊन वैद्यकीय आस्थापना (नोंदणी आणि नियमन) कायदा, २०१० आणि इलेक्ट्रॉनिक आरोग्य नोंदींवरील संबंधित नियमांचा संदर्भ न्यायालयाने दिला आहे.


न्यायलयाने दिलेल्या आदेशानुसार एनएमसीने सध्या देशात लागू असलेल्या नियमांनुसार सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये औषधाच्या चिठ्ठीच्या पद्धतींची अधिक सखोलपणे निरीक्षण करण्याची आवश्यकता नमूद केली. त्यानुसार प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयाने डीटीसीअंतर्गत उपसमिती स्थापन करून औषधाच्या चिठ्ठीचे प्रणालीबद्ध मूल्यमापन करणे, पद्धतींचा आढावा व विश्लेषण करणे आणि आवश्यक सुधारात्मक उपाय सुचवणे, या मूल्यमापनांचे निष्कर्ष डीटीसीच्या बैठकीच्या इतिवृत्तात नोंदविणे एनएमसीने बंधनकारक केले आहे.


एनएमसीने या इतिवृत्तांताची मागणी केल्यास त्यांना या नोंदी उपलब्ध करणे बंधनकार असणार आहे. सर्व वैद्यकीय महाविद्यालये व संस्थांना उप-समिती तत्काळ स्थापन करण्याचे आणि देखरेख यंत्रणा विलंब न करता कार्यान्वित करण्याचे निर्देशही एनएमसीने दिले आहेत.


कशी असावी औषधाची चिठ्ठी


प्रत्येक डॉक्टरने औषधाची चिठ्ठी स्पष्टपणे आणि शक्यतो मोठ्या अक्षरात लिहून द्यावी. औषधांची जेनेरिक नावेही लिहून द्यावीत. तसेच औषधांचा तर्कसंगत वापर यावर औषधाच्या चिठ्ठीमध्ये भर द्यावा. अशा सूचनाही आयोगाने केल्या आहेत.

Comments
Add Comment

Nitesh Rane: तलावातील गाळ काढण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, मंत्री नितेश राणे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तलावांतील गाळ काढण्यासाठी विशेष

Akshay Kumar: टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा अक्षय कुमारला धसका? अभिनेत्याने उचलले मोठे पाऊल

मुंबई: अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या कारवर 18 ऑक्टोबरला जुहू येथे तीन अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला होता. टायगर

Yugandhara Yuvati Sammelan 2026: नवी मुंबईत युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद; महापौर सुजाता पाटील यांचा महत्त्वाचा संदेश

नवी मुंबई: युवतींचा व्यक्तिमत्त्व विकास, आरोग्यविषयक जागरूकता, स्वसंरक्षण, उद्योजकता आणि भारतीय संस्कृतीतील

Nitesh Rane: मच्छीमार बांधवांच्या मदतीसाठी सरकार पुढे, मंत्री नितेश राणे यांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या

अहिल्यानगर: संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळामध्ये होरपळून निघत आहे. महाराष्ट्र दुष्काळाच्या सावटाखाली असताना

Indian Railway (Vivek Express): सलग 75 तासाचा रेल्वेचाप्रवास आणि स्वर्ग कधी अनुभवला आहे का? घेतला आहे का अशा रेल्वेप्रवासाचा अनुभव

[caption id="attachment_1068688" align="alignnone" width="850"] भारतीय रेल्वे: भारतीय लोकांना रेल्वेने प्रवास करायला फार आवडते. खिडकीजवळ बसून शेती,

4,4,4,4,4,4,4,4,4,4,4,4,4,4,4! झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात प्रतिका रावलचं झंझावाती शतक

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने खिशात घातली