वांद्रे पूर्व स्कायवॉकचा खर्च १७ कोटींनी वाढला, जलवाहिनी आणि पर्जन्य जलवाहिनींमुळे वाढला खर्च

एका सरकत्या जिन्याचे बांधकाम केले रद्द


मुंबई ( सचिन धानजी) : वांद्रे पूर्व येथील नव्याने बांधण्यात येणाऱ्या स्कायवॉकचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात असून या स्कायवॉकचा खर्चही आता तब्बल १७ कोटी रुपयांनी वाढल्याचे दिसून येत आहे. या स्कायवॉकच्या बांधकामाध्ये मोठ्या व्यासाची जलवाहिनी आल्याने तसेच पर्जन्य जलवाहिनी आल्याने या बांधकामाचा खर्च वाढला गेला आहे. तर येथील भूमिगत गटारामुळे एका सरकत्या जिन्याचे बांधकाम रद्द करण्यात आले आहे.


वांद्रे पूर्व येथील रेल्वे स्थानकापासून ते पश्चिम द्रुतगती महामार्ग पार करून म्हाडा कार्यालयापर्यंत महापालिकेच्यावतीने स्कायवॉक बांधण्यात येत आहे. यासाठी महापालिकेने विविध करांसह १०६ कोटी रुपये मंजूर केले होते. परंतु आता हा खर्च वाढून विविध करांसह याचा खर्च १२३ कोटींवर जावून पोहोचला आहे. महापालिकेने या कामांसाठी श्री. मंगलम बिल्डकॉन (आय) प्रा.लि. या कंपनीची निवड केली होती आणि त्यांच्या मार्फत हे काम सुरु आहे. परंतु हे काम असतानाच खांब क्र २४,२५, येथे२४०० मिमी. व्यासाची जलवाहिनी आढळून आली. त्यामुळे याठिकाणी खांब बांधता येत नसल्याने याचे बांधकाम दुसरीकडून वळवले. तसेच बेस्ट डेपो वांद्रे पर्यंत ही आकाशमार्गिका एक अतिरिक्त मार्गिका बांधण्याची आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या सर्विस रोडवरील खांब क्र ३० जवळ म्हाडा गल्ली येथे अतिरिक्त जिना लावण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात आली होती. परंतु खांब क्र. ५ ते १२ पर्यंत ३०० मिमी. व्यासाची जलवाहिनी आढळून आल्याने ती स्थलांतरीत करण्यात आली .


स्कायवॉकचे बांधकाम सुरु असताना खांब क्र. पी-१ ते पी-३ येथे १८०० मीमी व्यासाच्या तीन जलवाहिन्या अस्तित्वात असल्यामुळे मुख्य जलवाहिन्यापासून चार मीटर इतके अंतर सोडून फाऊंडेशनचे काम करणे शक्य नसल्यचा अभिप्राय सल्लागारांनी दिले. त्यामुळे या स्कायवॉकच्या बांधकामातून खांब क्र.पी-१ ते पी-३ हा अंदाजित ७० मीटर भाग वगळण्यात आला आहे. तसेच एकूण ०३ सरकते जिने बांधण्याचे प्रस्तावित होते. परंतु खांब क्र.पी-३३ येथे पर्जन्य जलवाहिनीचा भूमिगत प्रमुख नाला असल्याने तेथे सरकता जिना व त्यासाठी लागणारे मशीन रूम बांधता येणे शक्य नसल्यामुळे एका सरकता जिन्याचे काम कमी करून एकूण तीन सरकत्या जिन्यांपैकी फक्त दोन सरकते जिन्याचे काम करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे म्हाडा गल्लीपर्यंत अतिरिक्त जिना वाढवण्यासह इतर वाढीव कामांमुळे हा खर्च वाढला गेल असे अधिकाऱ्यांचे म्हण्णे आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने