सणाचा खरा आनंद लुटत जॅकलिनने साजरा केला ख्रिसमस!

मुंबई: देशभरात सर्वत्र ख्रिसमसची तयारी सुरू असून बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने सणाचा खरा उत्साह आणि महत्त्व जिवंत केल्याचे पहायला मिळत आहे. प्रसिद्ध समाजसेवक हुसैन मनसुरीसोबत जॅकलिनने मुंबईच्या रस्त्यांवर राहणाऱ्या वंचित मुलांमध्ये आनंद पसरवला. ज्यासाठी ती सांताक्लॉजच्या पोशाखात वस्तीतील मुलांसोबत सणाचा आनंद वाटताना दिसली. या कृतीमुळे जॅकलिन मधील प्रेमळपणा आणि मानवतावादी गुण दिसले.





या खास क्षणाचा व्हिडिओ जॅकलिनने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. ज्यात ती सांताक्लॉजच्या पोशाखात दिसत असून मुंबईतील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या मुलांना खाऊ आणि खेळण्यांच्या स्वरुपातील भेटवस्तू देत आहे. तिच्या या कृतीमुळे चाहत्यांचे लक्ष वेधले असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. चाहत्यांनी तिच्या या कृतीवर सकारात्मक कॉमेंट्स केल्या आहेत. सिनेसृष्टीच्या ग्लॅमर व्यतिरिक्त जॅकलिनचे हे आनंद पसरवण्याचे काम चाहत्यांनी उल्लेखनीय दर्जाचे ठरवले आहे. दरम्यान, देशभरातील सेलिब्रिटी त्यांच्या पद्धतीने ख्रिसमस साजरा करत असताना, जॅकलिन फर्नांडिसची ही कृती साधेपणा आणि प्रामाणिकपणासाठी वेगळी ठरली आहे.



दरम्यान, या कृतीने पुन्हा एकदा जॅकलिनचा सामाजिक उपक्रमांशी असलेला दीर्घकाळचा संबंध आणि सामाजिक कार्यांप्रती असलेली तिची वचनबद्धता प्रतिबिंबित होते. गेल्या काही वर्षांत, अभिनेत्रीने विविध मानवतावादी उपक्रमांना, विशेषतः लहान मुलं, शिक्षण आणि प्राण्यांविषयक संवेदनशील विषयांवर लक्ष केंद्रित करणाऱ्यांना सक्रियपणे पाठिंबा दिला आहे.


जॅकलिन फर्नांडीस ही श्रीलंकेची अभिनेत्री आणि मॉडेल आहे. जिने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत सध्याच्या घडीला स्टार बनली आहे. कीक, हाऊसफूल आणि मर्डर २ सारख्या चित्रपटांमध्ये ग्लॅमरस भूमिकांसाठी ती ओळखली जाते . २००६ मध्ये मिस युनिव्हर्स श्रीलंका जिंकल्यानंतर तिने तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. बहरीनमध्ये एका बहु-वंशीय कुटुंबात जन्मलेल्या या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी टेलिव्हिजनमध्ये सुरुवात करत स्वतःची एक यशस्वी, लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केली आहे. 

Comments
Add Comment

Rashmika Mandana: बोल्ड सीन्स आणि अंग प्रदर्शनाबद्दल रश्मिका मंदाना जरा स्पष्टच बोलली; म्हणाली, "लाज वाटते पण..."

[caption id="attachment_1068419" align="aligncenter" width="800"] टॉलिवूड कपल रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा अलीकडेच 'कॉफी विथ करण'च्या 9 व्या

'Janak' Marathi Movie: सायली संजीवच्या नव्या भूमिकेची चर्चा! ‘जनक’मधून उलगडणार बाप-लेकीच्या नात्याची कहाणी

ज्या बापाने लेकीसाठी आयुष्यभर आभाळाएवढं प्रेम दिलं, त्याच बापावर जेव्हा आरोपांचं सावट येतं, तेव्हा त्याच्या

Bigg Boss Season 20: या विकेंडला रोहित शेट्टी घेणार सदस्यांची शाळा; सलमान खान का राहणार गैरहजर?

बिग बॉस सीजन २० च्या मंचावर शोचा होस्ट सलमान खानने एक मोठी घोषणा केली आहे. या विकेंडला शोचा होस्ट बदलणार असल्याचं

Ranbir Kapoor : 'बुराई चाहे कितनी भी..."; दसरा कार्यक्रमातील वक्तव्यावरून रणबीर कपूर ट्रोल

Ranbir Kapoor: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र, दसऱ्यानिमित्त

Ramayana Movie : 'रामायण’मध्ये साई पल्लवीच सीतेच्या भूमिकेसाठी योग्य ! यशने सांगितलं निवडीमागचं कारण, अभिनेत्रीचं केलं भरभरून कौतुक

मुंबई : भारतीय महाकाव्य रामायणावर आधारित बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटाची सध्या मनोरंजनविश्वात जोरदार चर्चा सुरू

Suraj Chavan : सूरज चव्हाणच्या घरी चिमुकल्या परीचे थाटात स्वागत ! लेकीची पहिली झलक पाहून चाहतेही भारावले

Suraj Chavan : आपल्या साध्या स्वभावामुळे, खास बोलण्याच्या शैलीमुळे आणि ‘गुलिगत’ अंदाजामुळे लोकप्रिय झालेला ‘बिग बॉस