धारावीत दिवंगत सुर्यवंशीच्या मुलांवर आली रडण्याची वेळ, उबाठाला आली नाही दया


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : धारावीमध्ये आजवर उबाठा पक्षाला बळकटी देणाऱ्या राजेंद्र सुर्यवंशी यांच्या कुटुंबाला उबाठाने यंदाच्या निवडणुकीत पूर्णपणे नाराज केले . धारावीतील प्रभाग क्रमांक १८६मधून राजेंद्र सुर्यवंशी यांची कन्या अंजली या इच्छुक होत्या. परंतु मातोश्रीवर गेल्यानंतरही अंजली आणि भाऊ चेतन यांच्या पदरी निराशाच पडली. हे भाऊ बहिण आपल्याला उमेदवारी मिळेल म्हणून आपल्या आईवडिलांचे फोटो घेवून गेले होते. पण उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांच्या अश्रुचा बांध फुटला गेला आणि ते आई वडिलांचे फोटो उ कवटाळून ढसा ढसा रडू लागल्या.


धारावीतील प्रभाग क्रमांक १८४मधून राजेंद्र सुयर्वशी हे सन २०१७च्या निवडणुकीत उभे राहिले होते. या प्रभागातून काँग्रेसचे बब्बू खान यांनी त्यांचा पराभव केला होता. त्याआधी राजेंद्र सुर्यवंशी आणि त्यानंतर त्यांच्या पत्नी सुनंदा सुर्यवंशी या नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. धारावीतील शिवसेनेच्या संघटन वाढीमध्ये राजेंद्र सुर्यवंशी यांचा मोठा हात होता. परंतु कोविडनंतर राजेंद्र सुर्यवंशी आणि सुनंदा सुर्यवंशी यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांची कन्या अंजली सुर्यवंशी यांनी युवा सेनेच्या विधानसभा समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळली. तर त्यांचे बंधू चेतन सुर्यवंशी हे युवा सेनेचे माजी विधानसभा समन्वयक होते. उबाठाच्या युवा सेनेच्या माध्यमातून पक्ष संघटन वाढवण्यावर या दोन्ही भाऊ बहिणींनी आई वडिलांच्या निधनानंतर प्रयत्न केला


त्यामुळे प्रभाग क्रमांक १८६ अनुसूचित जाती महिला आरक्षित झाल्याने अंजली सुर्यवंशी यांनी मागील काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार सुरु केला होता. परंतु, मातोश्रीवर रविवारी रात्रीपासून सुरु असलेल्या अर्ज वाटपामध्ये अंजली सुर्यवंशी यांना उमेदवारी अर्ज नाकारण्यात आली. राजेंद्र सुर्यवंशी यांचे निधन झाल्यानंतर उबाठाने या दोन्ही मुलांची काळजी घेणे अपेक्षित असतानाही उबाठाने या दोन्ही मुलांना उमेदवारी नाकारत त्यांचे स्वप्न चक्काचूर केले आणि त्यांना वाऱ्यावर सोडून दिल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.


Comments
Add Comment

Dussehra 2026 : यंदा विजयादशमी २० की २१ ऑक्टोबरला ? जाणून घ्या रावण दहनाची योग्य वेळ आणि पूजेचे मुहूर्त!

भारतीय संस्कृतीमध्ये साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत पवित्र, आनंदाचा आणि उत्साहाचा सण म्हणजे 'दसरा' किंवा

Dhanush-Mammootty Movie : धनुष आणि ममूटी पहिल्यांदाच एकत्र झळकणार ? ‘OM: Chapter 1’ चित्रपटाची चर्चा, रिलीज डेट आली समोर

Dhanush-Mammootty Movie : दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार एकाच चित्रपटात पाहायला मिळणार असल्याच्या चर्चेने

रशियात शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा धोका आहे का, किती नुकसान झाले?

मॉस्को : रशियाच्या सुदूर पूर्वेकडील कामचटका द्वीपकल्प परिसरात शुक्रवारी भूकंपाचे अत्यंत तीव्र धक्के जाणवले.

Navi Mumbai Airport आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी तयार नाही? एमिरेट्सचा दावा; NMIA कडून खंडन!

मुंबई: भारतातील सर्वात मोठ्या परदेशी विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या एमिरेट्स कंपनीने, खानपान आणि मालवाहू गोदाम

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या टी20 सामन्यापूर्वी टीम इंडियाने हुकमी एक्का काढला, झालं असं की..

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील शेवटच्या सामन्यापूर्वी टीम इंडियात एक बदल करण्यात

Lakme Fashion Week : लडाखच्या 'पश्मिना' आणि पारंपरिक हस्तकलेचा नवी दिल्लीत डंका!

नवी दिल्ली : लडाखचे जगप्रसिद्ध 'पश्मिना' (Pashmina), सुंदर शाली आणि तिथल्या हाताच्या अप्रतिम कलाकुसरीची जादू सध्या