फूड डिलिव्हरी बॉय संपावर, थर्टी फर्स्टच्या घरगुती पार्ट्या संकटात ?

मुंबई : नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिट, झेप्टो आदी अॅपबेस्ड फूड ऑर्डर पूर्ण करणाऱ्या डिलिव्हरी पार्टनर्सनी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. या संपामुळे थर्टी फर्स्टच्या घरगुती पार्ट्या संकटात सापडल्या आहेत. फूड आणि क्विक कॉमर्स सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. वर्षातील सर्वात व्यस्त दिवशी डिलिव्हरी सेवा विस्कळीत होऊ शकतात, असा इशारा कामगार संघटनांनी दिला आहे.


फक्त १० मिनिटांच्या डिलिव्हरी मॉडेलमुळे सुरक्षिततेचा धोका वाढत असल्याचा आरोप करत गिग वर्कर्सनी संप पुकारला आहे. इंडियन फेडरेशन ऑफ अ‍ॅप-बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्सने सरकारकडे किमान मासिक उत्पन्न, विमा संरक्षण, कामाचे तास मर्यादित करणे आणि कामगार म्हणून कायदेशीर मान्यता अशा मागण्या केल्या आहेत. आपल्या मागण्यांसाठी डिलिव्हरी पार्टनर्सनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचे २५ डिसेंबर रोजी दिल्ली-एनसीआरमध्ये परिणाम दिसून आले. आता ३१ डिसेंबरलाही मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


दरम्यान, संपाचा परिणाम कमी करण्यासाठी झोमॅटो आणि स्विगीने डिलिव्हरी पार्टनर्ससाठी मोठ्या प्रमाणात इंसेंटिव जाहीर केली आहेत. झोमॅटोने पीक अवर्समध्ये प्रति ऑर्डर जादा मानधन आणि पेनल्टी माफीची घोषणा केली आहे. स्विगीने ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीदरम्यान मेगा कमाई ऑफर देत पीक अवर्समध्ये अतिरिक्त बोनस देण्याचे आश्वासन दिले आहे. झेप्टोनेही पेमेंट स्ट्रक्चरमध्ये बदल करत डिलिव्हरी सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : सुट्या खाद्य तेलाच्या विक्रीस वर्षभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

पारंपरिक व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी समिती स्थापन करणार मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Ashish Shelar : दहिसर 'ट्रान्सपोर्ट हब'च्या कामादरम्यान 'ब्लास्टिंग' नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा!

- पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; बाधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, खनिज वाहतुकीची चौकशी करावी मुंबई : दहिसर

Devendra Fadnavis : मंत्री नितेश राणे, संग्राम जगताप, महेश लांडगे हे हिंदू नायक, त्यांनी पुढेही हिंदुत्वासाठीच काम केले पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकोद्गार

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार संग्राम जगताप आणि महेश लांडगे हे तिघेही हिंदू नायक असून

AndheriNews : वीरा देसाई रोड, जे.पी, रोड, आझाद नगरमधील आता तुंबणार पाण्यातून होणार सुटका

मोगरा नाल्यातील प्रवाह आता वळवणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोड, जे.पी.रोड आणि आझाद

BMC : मोठ्या मंडळांसाठी समन्वय अधिकारी नेमा; समन्वय समितीची महापालिकेकडे मागणी!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत मोठ्याप्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात, अशा मंडळांसाठी महापालिकेने समन्वय

Malad Accident : "तिला मला शेवटचं पाहायचं आहे..."; जखमी पतीने व्हीलचेअरवरून घेतले पत्नीचे अखेरचे दर्शन

मुंबई : मालाडमध्ये रविवारी रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघाताने एका कुटुंबावर मोठा आघात केला. या अपघातात ३४