मुंबई महापालिका निवडणुकीसाठी इक्बाल सिंग चहल मुख्य निरीक्षक

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानासाठी अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) इक्बाल सिंग चहल यांची बुधवारी मुख्य निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. १९८९ बॅचचे आयएएस अधिकारी असलेले इक्बाल सिंग चहल यांनी मे २०२० पासून जवळपास चार वर्षे मुंबई महापालिका आयुक्त म्हणून काम पाहिले आहे.
राज्यातील उर्वरित २८ महानगरपालिकांसाठीही आयएएस अधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


ठाण्यात एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारसू, कल्याण-डोंबिवलीमध्ये एमआयडीसी संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मंताडा राजा दयानिधी, मीरा-भाईंदर येथे कौशल्य विकास आयुक्त अमित सैनी, उल्हासनगर शहरात


एमटीडीसी व्यवस्थापकीय संचालक निलेश गाटणे तर भिवंडी-निजामपूर येथे आदिवासी विकास महामंडळाचे अतिरिक्त आयुक्त गोपीचंद कदम यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


नवी मुंबईत महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक भाऊसाहेब दांगडे यांची विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वसई-विरार येथे पूर्वीपासून निवडणूक काळात तणावाचे वातावरण राहिल्याने महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डचे सीईओ प्रदीप पी. यांची विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर पनवेल येथे आयसीडीएस आयुक्त कैलास पगारे निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर