मंत्रिमंडळ बैठकीला मंत्री, अधिकारीच गैरहजर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नाराजी व्यक्त


मंत्रालयात शुकशुकाट


बैठकीला जेमतेम १४-१५ मंत्रीच हजर


मुंबई : ऐन महापालिका निवडणुकीच्या धावपळीत आणि वर्ष अखेरच्या दिवशी, बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. पण, या बैठकीला खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक कॅबिनेट मंत्र्यांनी दांडी मारली. शिवाय अनेक अधिकारी वर्षअखेरचा मुहूर्त साधून पर्यटनासाठी गेल्यामुळे बहुतांश अधिकाऱ्यांनीही दांडी मारली होती. सर्व दांडीबाहद्दर अधिकारी सुट्टीवर दिसतात, असे म्हणत कमी उपस्थितीवर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.


राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मंगळवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे अनेक राजकीय नेत्यांची धावपळ उडाली होती. कॅबिनेट मंत्र्यांसह, राज्यमंत्री आणि अन्य लोकप्रतिनिधींना पक्षाचे एबी फॉर्म दिलेल्यांना अर्ज भरण्यासाठी वेळेत कार्यालयात पाठविण्यासाठी, उमेदवारी नाकारलेल्यांची समजूत काढण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागली. नाराजांच्या रोषाला सामोर जाण्याचे प्रकार तर अनेक ठिकाणी घडले.


बुधवारी झालेल्या बैठकीकडे महापालिकांच्या धापवळीत असलेल्या कॅबिनेट बैठकीकडे पाठ फिरवली. खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही बैठकीला नव्हते.


राजकीय नेते, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधींची मंत्रालयाकडे पाठ


मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मंत्रालयात राज्यभरातील राजकीय नेते, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींची गर्दी असते. पण, महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे राजकीय नेते, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी व्यस्त असल्यामुळे त्यांनीही मुंबईकडे पाठ फिरवली. बैठकीनंतर गाठीभेठी घेण्यासाठी चढाओढ असते. पण, बुधवारी मंत्रालयात शुकशुकाट होता.


Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म