नव्या विमानतळाच्या धावपटटीच्या कार्यक्ष्मतेसाठी ‘टॅक्सीवे एम’ कार्यान्वित

गर्दीच्या वेळी आगमन आणि प्रस्थानाचा गोंधळ टळणार


मुंबई : जगातील सर्वात जास्त व्यस्त सिंगल-रनवे विमानतळांपैकी एक असलेल्या रनवेची कार्यक्षमता आणि कार्यात्मक महत्त्वपूर्ण एअरसाइड संरचना आणि सुविधा सुधारण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टॅक्सीवे एम हा छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एयरपोर्ट (सीएसएमआयए)ने कार्यान्वित केला आहे.


सीएसएमआयएमध्ये दररोज सरासरी ९५० पेक्षा जास्त विमानांची ये-जा सुरू असते. ही ये-जा प्रामुख्याने मुख्य रनवे ०९/२७ वरून केली जाते, ज्यावर हे कार्य व्यवस्थितपणे हाताळले जाते आणि त्याला पूर्वीपासून केवळ एकाच म्हणजे समांतर टॅक्सी ट्रॅक (पीटीटी) एन–एन १ चा आधार होता. पर्यायी पूर्ण-लांबीचा टॅक्सीवे नसल्याने याच ट्रॅकचा सातत्याने वापर होत राहिला. कालांतराने, सातत्याने विमानांची होणारी ये-जा तसेच मर्यादित देखभाल संधी यांमुळे या रनवेची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि एकाच टॅक्सी ट्रॅकवर अवलंबून राहिल्या जाऊ नये यासाठी पर्यायी समांतर टॅक्सीवेची आवश्यकता निर्माण झाली.


ही महत्त्वपूर्ण गरज पूर्ण करण्यासाठी टॅक्सीवे एमची संकल्पना मांडण्यात आली. तरीसुद्धा, या प्रोजेक्टमध्ये बऱ्याच अडचणी होत्या, कारण टॅक्सीवेला लागूनच एअरड्रोम रेस्क्यू अँड फायर फायटिंग (एआरएफएफ) इमारतीमुळे या टॅक्सीवेची निर्मिती कठिण होती. टॅक्सीवेची पूर्ण लांबी कनेक्ट होण्याकरिता, सीएसएमआयएने एआरएफएफ ही सुविधाच स्थलांतरित केली आणि तेथे एक तात्पुरते मुख्य अग्निशमन केंद्र कार्यान्वित केले, ज्यामुळे अखंडित सीएटी-१० आपत्कालीन प्रतिसाद क्षमतांची निश्चिती झाली आणि त्याच वेळी नवीन कायमस्वरूपी एआरएफएफ स्टेशनच्या बांधकामाला सुद्धा सुरुवात झाली.


चौथ्या नियंत्रण कालावधी (एफसीपी) दरम्यान कार्यान्वित झालेला हा प्रोजेक्ट अनेक टप्प्यांमध्ये पुढे नेण्यात आला. पहिल्या टप्प्यात रनवे १४-३२ जोडण्यात आला, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात एक सलग समांतर टॅक्सीवे नेटवर्क तयार करण्यात आले. तीन बाजूंनी सक्रिय टॅक्सीवे आणि चौथ्या बाजूला रनवे अशा अत्यंत मर्यादित एअरसाइड परिस्थितीमध्ये काम करण्याचे आव्हान असूनही, हा प्रोजेक्ट बारकाईने नियोजन, भागधारकांसोबत व्यवस्थित समन्वय आणि तत्काळ अंमलबजावणीद्वारे पूर्ण करण्यात आला. अंमलबजावणीदरम्यान समोर आलेल्या अज्ञात समोर आलेल्या समस्यांवरही त्वरित डिझाइन बदल करून उपाय काढण्यात आला, ज्यामुळे हा प्रोजेक्ट नियोजित वेळेनुसार पूर्ण होऊ शकला.
पावसाळी कालावधीसह सुमारे २४० दिवसांच्या बांधकाम कालावधीनंतर, टॅक्सीवे एम २५ डिसेंबर रोजी एरोनॉटिकल इन्फॉर्मेशन रेग्युलेशन अँड कंट्रोल सायकलसोबत व्यवस्थितपणे कार्यान्वित करण्यात आला. पावसाळ्याची लवकर सुरुवात आणि हवामानातील बदलांसारख्या आव्हानांना पार करत, हे काम वेळेवर पूर्ण होणे हे केवळ (सीएसएमआयए) टीमची सज्जता, दूरदृष्टी आणि अंमलबजावणीतील शिस्त, तसेच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (डीजीसीए) योग्य वेळेत मिळालेल्या मंजुऱ्या यामुळे शक्य झाले आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.