अफगाणिस्तानला पूराने झोडपले! १७ जण मृत्यूमुखी तर अनेकजण जखमी

काबूल: अफगाणिस्तानला मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीने चांगलेच झोडपून काढले आहे. शहरात अचानक आलेल्या पुरामुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धक्कादायक म्हणजे या पुरात आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला असून, ११ जण जखमी झालेत. मुसळधार पावसामुळे मध्य, उत्तर, दक्षिण आणि पश्चिम भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. या घटनेमुळे अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रवक्ते मोहम्मद युसूफ हम्मद यांनी सांगितले आहे.



अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रवक्ते मोहम्मद युसूफ हम्मद यांनी सांगितल्यानुसार, आठवड्याभरापासून बहुतेक मृत्यू पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये झालेत आणि तीव्र हवामानामुळे मध्य, उत्तर, दक्षिण आणि पश्चिम भागातही जनजीवन विस्कळीत झाले आहे. मोहम्मद म्हणाले की, पुरामुळे प्रभावित जिल्ह्यांमधील पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक पशू-पक्षी मृत्युमुखी पडले असून १८०० कुटुंबांना त्याचा फटका बसला आहे. यामुळे शहरी आणि ग्रामीण समुदायांमधील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.



दरम्यान व्यवस्थापनाने सर्वाधिक नुकसान झालेल्या भागात मूल्यांकन पथके पाठवली असून पुढील गरजांचे मूल्यांकन करण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे. भारताप्रमाणे अफगाणिस्तानदेखील हंगामी पावसानंतर अचानक आलेल्या पुरासाठी असुरक्षित आहे. देशात दशकांपासून सुरू असलेला संघर्ष, खराब पायाभूत सुविधा, जंगलतोड आणि हवामान बदलाचे वाढते परिणाम यामुळे अशा आपत्तींचा परिणाम वाढलाय. संयुक्त राष्ट्र आणि इतर संस्थांनी या आठवड्यात इशारा दिला होता की, २०२६ पर्यंत अफगाणिस्तान जगातील सर्वात मोठ्या मानवतावादी संकटांपैकी एक राहील. संयुक्त राष्ट्र आणि त्यांच्या मानवतावादी भागीदारांनी अफगाणिस्तानातील जवळजवळ १८ दशलक्ष गरजू लोकांना मदत करण्यासाठी १.७ अब्ज डॉलर्सच्या मदतीचे आवाहन केले आहे.


Comments
Add Comment

White House : अवघ्या पाच दिवसांत केटी झकारिया यांची व्हाइट हाऊसमधून एक्झिट; बार परीक्षा वादामुळे पद गमावले!

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनात व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी म्हणून

Singapore Haze 2026 : इंडोनेशियातील आगीचा सिंगापूरला फटका; प्रदूषणावर कंपन्यांवर होणार कारवाई?

सिंगापूर : इंडोनेशियातील जंगलांमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या धुरामुळे शेजारील सिंगापूरमधील हवा अत्यंत विषारी

Trump Ukraine : ट्रम्प यांचा युक्रेनला दुहेरी धक्का! रशियाकडून तेल खरेदी अन् स्टारलिंकवर निर्बंध?

वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडवून देत अमेरिकेने युक्रेनला एकाच वेळी दोन मोठे धक्के दिले आहेत.

Yemen Attack : मध्यपूर्वेत युद्धाचा भडका? येमेनमधील राजवाड्यावरील हल्ल्याने खळबळ

सना : मध्यपूर्वेतील भू-राजकीय संघर्षाला पुन्हा एकदा तीव्र उधाण आले असून, येमेनमध्ये हुती बंडखोरांनी थेट

रशियात शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा धोका आहे का, किती नुकसान झाले?

मॉस्को : रशियाच्या सुदूर पूर्वेकडील कामचटका द्वीपकल्प परिसरात शुक्रवारी भूकंपाचे अत्यंत तीव्र धक्के जाणवले.

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत