पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन ; वयाच्या ८२ वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणे : पुण्याचे माजी खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचे निधन झाले आहे. ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


१ मे १९४४ रोजी जन्मलेल्या सुरेश कलमाडी यांनी राजकारणात येण्यापूर्वी भारतीय हवाई दलात सहा वर्षांहून अधिक काळ पायलट म्हणून सेवा बजावली होती. हवाई दलातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. पुण्याचे प्रतिनिधित्व करत त्यांनी अनेक वर्षे खासदार म्हणून काम केलं. पी. व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये त्यांनी रेल्वे राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. रेल्वे राज्यमंत्री असतानाच रेल्वे बजेट सादर करणारे ते एकमेव राज्यमंत्री ठरले होते.


पुणे शहराच्या सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देण्यात कलमाडी यांचा मोलाचा वाटा होता. पुणे फेस्टिव्हल आणि पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनसारख्या उपक्रमांची सुरुवात करून त्यांनी शहराला राष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख मिळवून दिली.


१९९६ ते २०११ या कालावधीत त्यांनी भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्षपद भूषवले. या काळात भारतात अनेक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. २०१० मध्ये दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजक समितीचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले. मात्र या स्पर्धांदरम्यान खर्च, कंत्राटे आणि आर्थिक व्यवहारांवरून त्यांच्यावर गंभीर आरोप झाले. २५ एप्रिल २०११ रोजी सीबीआयने भ्रष्टाचार आणि कट रचल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक केली होती. यानंतर मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीकडून स्वतंत्र तपास सुरू करण्यात आला.


तपासात ठोस पुरावे न सापडल्यामुळे २०२५ मध्ये ईडीने क्लोजर रिपोर्ट दाखल केला, जो न्यायालयाने स्वीकारला. या निर्णयानंतर त्यांच्या सार्वजनिक प्रतिमेत काही प्रमाणात सुधारणा झाल्याचं पाहायला मिळालं. काही महिन्यांपूर्वी पुणे महापालिकेला दिलेली त्यांची भेटही राजकीय चर्चेचा विषय ठरली होती.

Comments
Add Comment

Ekta Kapoor : "धर्माचं पालन करणं ही समस्या कधीपासून झाली?"; चित्रपटसृष्टीतील 'हिंदूफोबिया'वर एकता कपूर संतापली

टेलिव्हिजन विश्वाची 'क्वीन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि आपल्या बोल्ड व यशस्वी कलाकृतींसाठी प्रसिद्ध असलेल्या

गुजरात हादरले! भरूचमधील केमिकल कंपनीत भीषण स्फोट; 5 कामगारांचा जणांचा मृत्यू, 6 गंभीर जखमी

भरूच (गुजरात) : गुजरातच्या भरूच जिल्ह्यात एका रासायनिक कंपनीत झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण परिसर हादरून गेला

Delhi mumbai expressway Accident : दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खातूश्यामजीच्या दर्शनासाठी निघालेल्या ८ भाविकांचा मृत्यू, ९ जण गंभीर जखमी

शनिवारी सकाळी राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात एक अतिशय दुर्दैवी घटना घडली. मध्य प्रदेशातील (Madhyapradesh) खातूश्यामजी

Nashik : शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात मोठी घडामोड ! अमोल कुलकर्णीचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाकडून फेटाळला

Nashik : राज्यभर चर्चेत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या

Tech Addiction : लहान मुलांच्या हातातून मोबाईल हिसकावून घेण्याची वेळ आलीय? सुप्रीम कोर्टाची केंद्राला मोठी नोटीस

नवी दिल्ली : आजकाल प्रत्येक पालकाची एकच डोकेदुखी असते ती म्हणजे, "माझं मूल दिवसभर मोबाईल आणि सोशल मीडियावर काय

BMC Action: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्यावर BMC चा हातोडा, नेमकं कारण काय?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण सध्या त्याच्या जुहू येथील बंगल्यामुळे चर्चेत आला आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC)