मंगेश काळोखे हत्या प्रकरणात २० लाखांची सुपारी देऊन हत्या

पुणे कनेक्शन उघड, १२ आरोपी अटकेत


अलिबाग : खोपोलीच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या निघृण हत्येप्रकरणी रायगड पोलिसांनी मोठा खुलासा केला असून, ही हत्या तब्बल २० लाखांच्या सुपारीतून करण्यात आल्याचे पोलीस तपासातून स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर या गुन्ह्याचे पुणे कनेक्शन समोर आले.


रायगड पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येचा मुख्य सूत्रधार रवींद्र देवकर असून, त्याने इशा पापा शेख हिच्यामार्फत कॉन्ट्रॅक्ट किलरना सुपारी दिली होती. आदिल मुखत्यार शेख, खालीद खलिल कुरेशी आणि एका फरार आरोपीला मिळून २० लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. आर्थिक व्यवहार, मोबाईल कॉल डिटेल्स आणि आरोपींच्या जबाबांच्या आधारे हा संपूर्ण कट उघडकीस आला. पोलीस तपासानुसार ही हत्या पूर्णतः पूर्वनियोजित होती. आरोपींनी अनेक दिवस मंगेश काळोखे यांच्या हालचालींवर लक्ष ठेवत रेकी केली आणि योग्य संधी साधून हा हल्ला केला. सुपारी घेणाऱ्या कॉन्ट्रॅक्ट किलरला पुण्यातून ताब्यात घेण्यात रायगड पोलिसांना यश आले असून, त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर तपासाला वेग आला आहे. एक आरोपी अद्याप फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत रवींद्र देवकर, त्याचा मुलगा दर्शन देवकर व धनेश देवकर, पत्नी उर्मिला देवकर, इशा पापा शेख, आदिल मुखत्यार शेख, खालीद खलिल कुरेशी, सचिन चव्हाण यांच्यासह एकूण १२ जणांना अटक करण्यात आली आहे. हत्येमागे जुने वैमनस्य आणि निवडणूक पराभवाचा राग कारणीभूत असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

पुण्यात भरधाव कारचा थरार! एमआयटी कॉलेज रोडवर 3 ते 4 दुचाकींना धडक; 24 वर्षीय चालक पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात भरधाव कारने अनेक दुचाकींना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. एमआयटी

Pune Weather : उकाड्यापाठोपाठ पुण्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' जारी

पुणे : गेल्या काही दिवसांपासून वाढलेली ऑक्टोबर हीट आणि प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांसाठी एक

Yashasvi Jaiswal ODI Snub : यशस्वी जयस्वालला वनडे संघातून डावललं! आर. अश्विन संतापला; निवडकर्त्यांना सुनावलं, म्हणाला ‘हा अन्याय!’

भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल याला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत संधी न मिळाल्याने

White House : अवघ्या पाच दिवसांत केटी झकारिया यांची व्हाइट हाऊसमधून एक्झिट; बार परीक्षा वादामुळे पद गमावले!

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनात व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी म्हणून

Wasim Jaffer : टीम इंडियाला मिळणार नवा मुख्य निवडकर्ता? 31 कसोटी खेळलेल्या दिग्गजाचे नाव चर्चेत; BCCI च्या निर्णयाकडे लक्ष!

Wasim Jaffer : भारतीय क्रिकेटमध्ये सध्या नव्या मुख्य निवडकर्त्याच्या नियुक्तीची चर्चा रंगली आहे. भारताकडून 31 कसोटी

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल; छातीत संसर्ग, प्रकृती स्थिर

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना छातीत संसर्ग झाल्याने दिल्लीतील अपोलो