मुंबईतील माजी महापौरांच्या मालमत्तेत कोट्यवधींची वाढ

उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून माहिती समोर


मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणूक रिंगणात चार माजी महापौर उतरले असून त्या सर्वांची मालमत्ता कोट्यवधींच्या घरांत गेली आहे. यामध्ये माजी महापौर श्रध्दा जाधव, किशोरी पेडणेकर, विशाखा राऊत, मिलिंद वैद्य आणि उपमहापौर हेमांगी वरळीकर यांची सन २०१७च्या निवडणुकीमध्ये दाखवलेल्या मालमत्तेच्या तुलनेत ही वाढ मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. एका बाजूला कोरोना काळात सर्वांचे नोकरी, व्यवसाय डबघाईला तसेच आर्थिक संकटात लोटले गेले होते, तिथे माजी महापौरांच्या आमदनीमध्ये मात्र विलक्षण वाढ झाल्याचे दिसून येत आहे.


मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. या अर्जासोबत उमेदवारांनी आपले प्रतिज्ञापत्र सादर केले असून त्यामध्ये उत्पन्न आणि मालमत्तेची माहिती दिली आहे. महापालिका विसर्जित होण्यापूर्वी महापालिकेच्या महापौर म्हणून राहिलेल्या किशोरी पेडणेकर यांच्या मालमत्तेत साडेतीन कोटींमध्ये वाढ झाली आहे. सन २०१७ मध्ये १ कोटी ६१ लाख रुपये एवढी मालमत्ता होती, तर हे उत्पन्न वाढून आता ५ कोटी २६ लाख रुपये एवढे झाले आहे. तर सभागृह नेत्या राहिलेल्या माजी महापौर विशाखा राऊत यांच्या मालमत्तेतही सुमारे सहा कोटींनी वाढ झाल्याचे दिसून येते. यापूर्वी त्यांची मालमत्ता ही १४.३७ कोटी रुपये एवढी होती आणि आता ही २१.८३ कोटी रुपये एवढी झाली आहे.


माजी महापौर श्रध्दा जाधव यांच्या मालमत्तेत सुमारे अडीच कोटींनी वाढ झाली आहे. त्यामुळे यापूर्वी त्यांची एकूण मालमत्ता ही ४४.२९ कोटी रुपये एवढी होती, जी आता ४६.३४ कोटी रुपये एवढी आहे. तर माजी महापौर मिलिंद वैद्य यांची मालमत्तेतही १० कोटींमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी सन २०१७मध्ये त्यांनी आपली मालमत्ता २.१४ कोटी रुपये एवढी दर्शवली होती. जी आता १३.३९ कोटी रुपये एवढी दर्शवली आहे. तर माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर यांच्याही मालमत्तेत सुमारे पाच कोटींनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील २०१७च्या निवडणुकीत हेमांगी वरळीकर यांनी १.८५ कोटी रुपये एवढी मालमत्ता होती, जी आता ७.१३ कोटी रुपये एवढी दर्शवली गेली आहे.


उमेदवार : किशोरी पेडणेकर (माजी महापौर) - (उबाठा) प्रभाग १९९ (सात रास्ता- धोबीघाट)


व्यवसाय : व्यवसाय


 २०२५ पर्यंत एकूण जंगम आणि स्थावर मालमत्ता : ५,२६,४५,८५६


 सन २०१७ची एकूण जंगम आणि स्थावर मालमत्ता : १,६१,५३, २५१


उमेदवार : विशाखा राऊत (माजी महापौर) - (उबाठा) प्रभाग १९१ (माहीम-शिवाजी पार्क)


व्यवसाय : व्यवसाय


 २०२५ पर्यंत एकूण जंगम आणि स्थावर मालमत्ता : २१, ८३,००, ९१५


 २०१७ ची एकूण जंगम आणि स्थावर मालमत्ता : १४, ३७, ४३,९०५


उमेदवार : श्रद्धा जाधव (माजी महापौर): (उबाठा) प्रभाग २०२ (शिवडी)


व्यवसाय : व्यवसाय


 २०२५ पर्यंत एकूण जंगम आणि स्थावर मालमत्ता : ४६,३४,७२,४७३


 सन २०१७ ची एकूण जंगम आणि स्थावर मालमत्ता : ४४,२९,७८,२२०


उमेदवार : हेमांगी वरळीकर (माजी उपमहापौर) - (उबाठा) प्रभाग १९३ (वरळी कोळीवाडा)


व्यवसाय: उल्लेख नाही


 सन २०२५ पर्यंत एकूण जंगम आणि स्थाव र मालमत्ता :७,१३,४४,३७५


 एकूण जंगम आणि स्थावर मालमत्ता सन २०१७ : १,८५,९३,८६५


उमेदवार : मिलिंद वैद्य (माजी महापौर) (उबाठा) प्रभाग १८२ (माहीम कोळीवाडा, पोलिस कॉलनी )


व्यवसायः व्यवसाय


२०२५ पर्यंत एकूण जंगम आणि स्थावर मालमत्ता: १३.३९ कोटी रुपये


सन २०१७ची एकूण जंगम आणि स्थावर मालमत्ता:२.१४ कोटी रुपये

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर