सह्याद्रीतील दुर्गम 'गुळाच्या ढेपा' सुळक्यावर यशस्वी चढाई

सुधागड तालुक्यातील गिर्यारोहकांची उल्लेखनीय कामगिरी


गौसखान पठाण सुधागड-पाली : तालुक्यातील गिर्यारोहक मॅकमोहन यांच्यासह अमित तोरसकर आणि नीलेश कवडे यांनी सह्याद्रीतील दुर्गम मानल्या जाणाऱ्या गुळाच्या ढेपा सुळक्यावर नुकतीच यशस्वी गिर्यारोहण करत उल्लेखनीय कामगिरी केली. सुधागड किल्ल्याला जोडलेल्या डोंगरसोंडेवर तैलबैला परिसरातून खाली आलेल्या धारेवर वसलेले गुळाच्या ढेपा हे चार सुळके गिर्यारोहणासाठी प्रसिद्ध आहेत. यापैकी गुळाची ढेप-२ हा सुळका सुमारे ११० फूट उंच असून सोप्या श्रेणीतील मार्गाने हा सुळका सर करण्यात आला. या मोहिमेत सुरक्षिततेचे सर्व नियम पाळत तांत्रिक कौशल्य व योग्य नियोजनाच्या जोरावर शिखर गाठण्यात आले. या यशस्वी मोहिमेमुळे सुधागड तालुक्यातील गिर्यारोहकांचा नावलौकिक वाढला असून परिसरातील युवकांसाठी ही कामगिरी प्रेरणादायी ठरली.


गुळाची ढेप २ व ३ यांमधील खिंडीतून आरोहण मार्गाची सुरुवात होते. सोपे आरोहण करून माथ्यावर पोहोचता येते. मार्गातील प्रस्तराला टेप लावून दोर ओवता येतो दोर लावण्यासाठी माथ्यावर झाड आहे. या सुळके समूहापर्यंत वेगवेगळ्या मार्गांनी जाता येते. तैलबैला सुळके सर केल्यानंतर गुळाच्या ढेपा सुळक्यांकरिता कोकणात उतरता येते. तैलबैला पठारावरून तैलबैला सुळके डावीकडे ठेवत सुधागडाकडील कड्यापर्यंत गेले की खाली साध्यकडा व सुधागडाला जोडणाऱ्या धारेवर असलेले चार सुळके दिसतात. या धारेवर उतरणारी वाट कड्यातील ओढ्यातून खाली जाते ती शोधून खाली डोंगरधारेवर जायचे. घळीत मातीचा निसरडा चढ आहे. चौथ्या सुळक्यापर्यंत जाण्यासाठी पुन्हा खाली यायचे व सुळका खाली आलेल्या ओढ्यातून वर जायचं. तैलबैला सर करून सवाष्णी घाटमार्गे धोंडसे गावात उतरायचं आणि किल्ल्यावर जाणाऱ्या वाटेने वर येत सुळक्याखाली असलेल्या ओढ्यात पोहोचायचं मुंबई किंवा पुण्यावरून पाली-वैतागवाडी मार्गेही धोंडसे गावात पोहोचता येते. तिथून गुळाची ढेप-१ पर्यंत पोहोचण्यामाठी माध्यकड्यापर्यंत सुळक्याकडून गेलेली डोंगर धार यांमधील खिंडीत पोहोचायचं व धारेवरून सुळक्यापर्यंत गेलेल्या वाटेने सुळक्याच्या पायथ्याला यायचे आलेल्या घळीतून वर जायचं. ठाकूरवाडी हे सुधागडाच्या पायथ्याला वसलेले गाव आहे. ठाकूरवाडीत उतरून गूळाच्या डेपांपर्यंत पोहोचता येते. ठाकूरवाडीत उत्तरल्यानंतर सुधागडास आपल्या डावीकडे ठेवत नदीच्या काठाकाठाने जाणाऱ्या वाटेने धनगडाच्या दिशेने चालत राहायचं सुधागडाच्या दुसऱ्या टोकाला आल्यानंतर गुळाच्या ढेपांची वरची टोके दिसू लागतात. या सुळक्यांच्या खाली समांतर आल्यानंतर जंगलातून वाट काढत सुळक्यांच्या पायथ्यापर्यंत जाता येते.

Comments
Add Comment

Trendy Earrings for Traditional Look : पारंपरिक कार्यक्रमात घाला हे ट्रेंडी कानातले; तुमचा लूक दिसेल आणखी सुंदर आणि स्टायलिश!

मुंबई : लग्नसराई, सण-समारंभ किंवा कोणताही पारंपरिक कार्यक्रम म्हटलं की महिलांना आपल्या लूकमध्ये काहीतरी खास

Leftover Rice Recipe : आता उरलेला भात कधीच वाया जाणार नाही! घरातच बनवा चटपटीत राईस कुरकुरे; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खुश

तुम्हीही रात्रीचा किंवा दुपारचा उरलेला भात शिळा झाला म्हणून फेकून देण्याच्या विचारात आहात

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.

Nashik : नोकरीचे आमिष दाखवले अन् ३ लाख ३० हजार उकळले, गुन्हा दाखल

Nashik : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आमिष दाखवून

Nashik : वीज चोरी प्रकरणांतील कामात हलगर्जीपणा नडला, महावितरणचे कार्यकारी अभियंता निलंबित

Nashik : १ कोटी ४६ लाख रुपयांच्या औद्योगिक वीज चोरी प्रकरणातील वसुली आणि कायदेशीर कारवाईचे प्रकरण रेंगाळत ठेवणे, तसेच