लाडक्या बहिणींना धक्का; केवायसी न केलेल्या आणि नियमांचे उल्लंघन केलेल्या महिला योजनेतून बाद

मुंबई : महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक सहाय्य मिळावं यासाठी महायुती सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' सुरू केली. ही योजना सुरू करतानाच राज्य शासनाने पात्रतेचे निकष निश्चित केले होते. पण सुरुवातीला दिशाभूल करणारी माहिती देऊन अनेक महिलांनी योजनेचा गैरफायदा घेतला. या प्रकाराचा अंदाज येताच राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ घेण्यासाठी महिलांना केवायसी करण्याचे निर्देश दिले. केवायसी केल्यानंतर नियमांचे उल्लंघन केलेल्या महिलांना योजनेतून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच विहित मुदतीत केवायसी केले नाही तर योजनेचे लाभ दिले जाणार नाहीत असेही जाहीर करण्यात आले. सरकारने हे दिशानिर्देश दिल्यानंतर योजनेतून अनेक महिला बाद झाल्या आहेत


केवायसी करण्याआधी दिशाभूल करणारी माहिती देऊन योजनेचे लाभ घेत असलेल्या अनेक महिला केवायसी केल्यानंतर योजनेसाठी अपात्र झाल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजेसाठी जाहीर केलेल्या निकषांनुसार सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांना लाभ मिळू शकत नाही. तसेच वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या महिलांना योजनेचे लाभ मिळत नाहीत. पण सुरुवातीला दिशाभूल करणारी माहिती देऊन अनेक महिलांनी योजनेचे लाभ घेतले होते. आता शासकीय कर्मचारी आणि उत्पन्नाचा नियम या नियमांमुळे अनेक महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून बाद झाल्या आहेत. योजनेतून बाद झालेल्या महिलांना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. पण केवायसी केलेल्या आणि योजनेच्या निकषांत बसणाऱ्या पात्र महिलांना  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ मिळत राहतील.


शासकीय सेवेत असलेल्या महिला तसेच अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला अपात्र आहेत. पण शासकीय सेवेत नसलेल्या तसेच अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला पात्र आहेत. योजनेला पात्र असलेल्या आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या महिलांना यापुढेही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ मिळत राहणार आहेत.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने