निवडणुकीत नातवाचे तिकीट कापताच आजीने धरलं 'या' मंत्र्याला धारेवर

कोल्हापूर : राज्यात सर्वच्या सर्व २९ मनपांसाठी १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी तसेच निकाल आहे. या मनपांसाठी सर्वच पक्ष आपापल्या ताकदीनुसार प्रचार करत आहेत. प्रचाराची रणधुमाळी उडाली आहे. या वातावरणात काही ठिकाणी नवे तर काही ठिकाणी जुनेच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राजकीय सोयीसाठी काही ठिकाणी निष्ठावंतांना डावलून इतर पक्षातून आपल्याकडे नुकत्याच आलेल्या व्यक्तीला जिंकून येण्याच्या क्षमतेचा विचार करुन


महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी आहे. त्यामुळे काही ठिकाणी नवे उमेदवारांची ओळख होत आहे तर काही ठिकाणी जुने उमेदवार पुन्हा उभे राहता आहेत काही ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून अलीकडेच पक्षात दाखल झालेल्या उमेदवारांना तिकीट मिळत आहे. त्यामुळे काही ठिकाणी उमेदवारांचे आणि इच्छुकांचे रुसवे फुगवे सुरू आहेत.


अश्यातच कोल्हापुरातून एका आजीचा एका नेत्याशी बोलतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आपल्या नातवाला डावलून दुसऱ्याला तिकीट दिल्याने आजीने चक्क मंत्र्यालाच धारेवर धरले आहे. प्रत्येक नेता आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा, प्रचारफेऱ्या घेत आहे. मतदारसंघांमध्ये जाऊन मतदारांची भेट घेत आहे. भाजपचे नेते चंद्रकांत पाटीलही कोल्हापुरात प्रचारासाठी गेले होते. तेव्हाच त्यांना एका आजीने विचारलेला प्रश्न सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


आजींचा नातू महानगरपालिका निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक होता. स्थानिक पातळीवर त्याने तयारीही केली होती. मात्र उमेदवारांच्या यादीत नाव न आल्याने कुटुंबीयांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले. अखेर या नाराजीचा उद्रेक थेट मंत्र्यांसमोरच झाला. मंत्री चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर येथे कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी अचानक एका आजीने त्यांचा रस्ता अडवला. “माझ्या नातवाचं तिकीट का कापलं?” असा थेट सवाल करत आजीने आपली व्यथा मांडली. आजीचा रोखठोक सवाल आणि त्यामागची भावनिक बाजू पाहून उपस्थित कार्यकर्तेही क्षणभर अवाकही झाले.


या प्रसंगी वातावरण हाताळत चंद्रकांत पाटील यांनी आजीचा हात हातात घेऊन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. 'यावेळी जमलं नाही, पुढच्या वेळी नक्की तुमच्या नातवाला तिकीट देऊ' असे आश्वासन देत आजीची समजूत काढली. या आश्वासनानंतरच आजीचा राग काहीसा शांत झाल्याचे व्हिडीओ मधून दिसले. उमेदवारीच्या तिकिटावरून अनेक ठिकाणी नाराजीचे सूर उमटत राहतात, मात्र आजीने रोखठोक वागत सरळ मंत्र्यालाच जाब विचारल्याने हा प्रसंग लक्ष वेधणारा ठरला आहे

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी