रायगड जिल्ह्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

५ वर्षांत १ हजार १७४ अत्याचाराचे गुन्हे


सुभाष म्हात्रे अलिबाग : रायगड जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२५ या ५ वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात महिला शारीरिक अत्याचाराचे ५०८ व विनयभंगाचे ६६६ असे १ हजार १७४ गुन्हे दाखल झाले आहेत. बलात्कार व विनयभंगाच्या गुन्ह्यांवर नजर टाकल्यास जिल्ह्यातील महिला सुरक्षित नसल्याचे सत्य समोर येत आहे. रायगड जिल्ह्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


रायगड जिल्ह्यात महिला सुरक्षित नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. जिल्ह्यात बलात्कार व विनयभंगाचे गुन्हे वाढले असून, दर आठवड्याला सरासरी चार ते पाच महिला या गुन्ह्यांना बळी पडत आहेत. या गुन्ह्यांची उकल करून आरोपींना गजाआड करण्यात यश आल्याचे पोलीस विभागाकडून स्पष्ट करण्यात आले असून, ९८.८० टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.


बाजारात गर्दीच्या ठिकाणी, प्रवासात महिला प्रवाशांशी अंगलट, अल्पवयीन विद्यार्थिनींशी चाळे, महाविद्यालय आवारात छेडखानी, नको तिथे स्पर्श करून लज्जा उत्पन्न करणारे कृत्य असे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडतात, तर लग्नाचे अामिष दाखवून, नोकरीत बढती देण्याचे अामिष तसेच इतर प्रकारे शारीरिक संबंध प्रस्तापित करून तक्रारीही दाखल होत आहेत. पूर्वी अत्याचाराला बळी पडलेल्या महिला बदनामीला घाबरून गप्प बसत असत. आता महिला आपल्यावरील अत्याचाराविरोधात आवाज उठवू लागल्या आहेत.


महिला सुरक्षिततेसाठी दामिनी पथक : रायगड जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस विभागाने महिला पोलिसांच्या दामिनी पथकाची निर्मिती केली आहे. त्यांना मोटारसायकल चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या पथकाला विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालये, बाजारपेठ, समुद्र किनारे आणि गर्दीच्या ठिकाणी या पथकाची नियमित गस्त सुरू असते. या पथकांचे नंबर शाळकरी मुली, महाविद्यालयीन तरुणी आणि महिलांना उपलब्ध करून दिले असून, या नंबरवर संपर्क साधल्यास अवघ्या काही मिनिटांत दामिनी पथक घटनास्थळी दाखल होऊ शकेल अशी व्यवस्था आहे. मात्र एवढे प्रयत्न करूनही महिलांसंबंधी गुन्हे कमी झाले नसल्याचे चित्र दाखल गुन्ह्यांची आकडेवारी पाहिल्यानंतर दिसून येते.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण