शिवसेना ठाकरे गटाला पुण्यात धक्का ; ठाकरे गटाच्या बंडखोर उमेदवारासह, अधिकृत उमेदवारांचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे : पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ आणि ११ मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या बंडखोर उमेदवारासह, अधिकृत उमेदवारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.


राज्यात सध्या २९ महानगर पालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशातच पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ नई ११ मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा फटका बसला आहे. ठाकरे गटाच्या बंडखोर उमेदवारासह, अधिकृत उमेदवारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या उमेदवारांनी भाजपच्या अधिकृत उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला असून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत करुन अभिनंदन केले. तसेच पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा ही दिल्या आहेत.


शिवसेना ठाकरे गटाला पुण्यात धक्का


प्रभाग क्रमांक ९ (ड) आणि (क)मधील शिवसेना उबाठा गटाचे बंडखोर उमेदवार महेश सुतार(ड), पूजा सुतार (क), नियोजन समितीचे सदस्य सुखदेव तापकीर आणि प्रभाग क्रमांक ११ (अ) गटाचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब धनवडे आणि विद्यार्थी सेनेचे अमर गायकवाड, माजी नगरसेवक पैलवान दिलीपदादा गायकवाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करुन भाजपा उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे.


चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश


चंद्रकांत पाटील यांनी या सर्वांचे पाटील यांनी पक्षात स्वागत करुन त्यांचे अभिनंदन केले. तसेच, पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी ‘भारतीय जनता पक्षासाठी हे सर्व पक्षप्रवेश अतिशय आनंद देणारे असून, यापूर्वी पक्षाचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या पक्ष प्रवेशावेळी भाजपचे प्रभाग क्रमांक ९ मधील भाजपचे उमेदवार लहू बालवडकर, गणेश कळमकर, रोहिणी चिमटे, प्रभाग क्रमांक ११ मधील भाजप उमेदवार अजय मारणे, अभिजीत राऊत, भाजपचे नेते डॉ. संदीप बुटाला, प्रकाशतात्या बालवडकर, प्रल्हाद सायकर, राहुल कोकाटे, शिवम बालवडकर यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण