शिवप्रेमींसाठी खुशखबर! किल्ले रायगड नव्या रूपात इतिहासप्रेमींच्या भेटीला

रायगड : हिंदवी स्वराज्याची राजधानी,छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैभवशाली परंपरेला जपणारं किल्ले रायगड आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नव्या रूपात उजळणार आहे. बहुप्रतिक्षित 'लाईट अँड साऊंड शो'येत्या काही दिवसांत किल्ले रायगडावर सुरू होणार आहे.देशातील पहिलाच ३६० अंशांचा लाईट अँड साऊंड शो रायगडावर उभारला जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांनी आज किल्ले रायगडावर प्रत्यक्ष भेट देत कामांची पाहणी केली.


लाईट अँड साऊंड शोसाठी उभारण्यात येणारी प्रकाशयोजना, स्पॉटलाईट्स, साऊंड सिस्टिम, कंट्रोल यंत्रणा, त्याचसोबत गडावरील विविध ऐतिहासिक स्थळाचा समावेश केला जाणार आहे. ४५ मिनिटांच्या या शो मध्ये बाजारपेठ, होळीचा माळ, नगारखाना, राजसदर, जगदीश्वर मंदिर, शिवसमाधी स्थळासह गडावरील इतर शिवकालीन वास्तू,मावळ्यांचे पराक्रम,शिवराज्याभिषेक सोहळा,तसेच स्वराज्याची उभारणी या सर्व ऐतिहासिक क्षणांना प्रकाश आणि ध्वनी प्रभावातून जिवंत केले जाणार आहे.


सोशल मीडियाच्या माध्यमातून का होतेय टीका?


परंतु, दुसरीकडे सोशल मीडियावर रायगड प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या जतन आणि संवर्धन कामांवर टीका केली जात आहे.लौकिक गोळे नावाच्या तरुणाने सोशल मीडियावर रिल्स पोस्ट करत किल्ले रायगडावरील काही पायऱ्या आणि भिंतींचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप केला आहे.या रिल्समध्ये सहज निखळणारे दगड, दगडांच्या जॉईंटमध्ये भरलेली माती,तसेच ऐतिहासिक स्वरूपाला धक्का लावणारे काम सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हिडिओंमुळे इतिहासप्रेमी आणि शिवभक्तांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.


एकीकडे रायगडावर इतिहास जिवंत करणारा भव्य लाईट अँड साऊंड शो सुरू होण्याच्या तयारीत आहे,तर दुसरीकडे प्राधिकरणाच्या कामांवरून वाद निर्माण झाला आहे.त्यामुळे येत्या काळात रायगडावरील विकासकामे, जतन प्रक्रिया आणि पारदर्शकता याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.छत्रपती संभाजी राजे यांनी किल्ले रायगडावर सुरू असलेल्या रायगड प्राधिकरण विकासाच्या मार्फत कामांचा आढावा घेतला. छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली. सरकारने याकडे विशेष लक्ष देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Comments
Add Comment

Nashik : नाशिकमध्ये वाहनांच्या ई-लिलावाची प्रक्रिया, वाहनधारकांनी थकीत कर तातडीने भरावा

नाशिक : प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत (RTO) आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये १५ वर्षे पूर्ण झालेली

Yemen Attack : मध्यपूर्वेत युद्धाचा भडका? येमेनमधील राजवाड्यावरील हल्ल्याने खळबळ

सना : मध्यपूर्वेतील भू-राजकीय संघर्षाला पुन्हा एकदा तीव्र उधाण आले असून, येमेनमध्ये हुती बंडखोरांनी थेट

Jalgaon : चाळीसगाव रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट! पार्सल हब म्हणून विकसित करण्याची रेल्वेची तयारी

चाळीसगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील चाळीसगाव रेल्वे स्थानकाला आता पार्सल हब म्हणून विकसित करण्याची

Jai Meena Asian Games : "पंतप्रधानांनी पाठ थोपटत म्हटलं, 'धन्यवाद आपका'..."; आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचणाऱ्या जय मीनाच्या खास आठवणी!

जपानमधील आयची-नागोया येथे पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये (Aichi-Nagoya Asian Games 2026) भारताचा प्रतिभावान खेळाडू

Nashik Crime : नाशिकमध्ये एमडी ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Nashik Crime : नाशिक शहरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

Virar News: विरारमध्ये ज्युनिअर आर्टिस्टची आत्महत्या, अश्लील व्हिडिओंच्या आधारे कोट्यवधींची खंडणी उकळल्याचा आरोप

विरार: अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी उकळल्याच्या प्रकाराला कंटाळून