मतदान करा आणि हॉटेलमध्ये जावून कमी पैशात खा - मतदार जानजागृतीसाठी आहार संघटनेचा पुढाकार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने मतदारांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी ‘मतदारांचे सुनियोजित शिक्षण आणि निवडणूक सहभाग’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांना समाजातील विविध घटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, महाराष्ट्रातील आदरातिथ्य क्षेत्रातील अग्रगण्य संघटना असलेल्या इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (आहार) यांनीही मतदार जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान केलेल्या मतदारांना आहार संघटनेशी संलग्न असलेल्या रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये विशिष्ट सवलत देण्यात येणार आहे.मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२०२६ करिता गुरुवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे.


महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांच्या नेतृत्वाखाली आणि अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वीप’ उपक्रम राबविण्यात येत आहे. महानगरपालिकेचे सह आयुक्त (कर निर्धारण व संकलन / निवडणूक) विश्वास शंकरवार, सहायक आयुक्त (करनिर्धारण व संकलन) डॉ. गजानन बेल्लाळे यांच्या सूचनेनुसार महानगरपालिकेमार्फत सर्वसमावेशक व बहुआयामी मतदार जागृती अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या स्वीप उपक्रमांतर्गत पथनाट्यांचे आयोजन, मतदार जनजागृती फेरी, प्रभात फेरी, शाळा–महाविद्यालयांमधील उपक्रम, विद्यार्थ्यांकडून त्यांच्या पालकांसाठी मतदान संकल्पपत्र भरून घेणे, तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक माध्यमांतून मतदानाचे महत्त्व अधोरेखित केले जात आहे.


याच पार्श्वभूमीवर, आहार संघटनेने मुंबई महानगरपालिका व निवडणूक प्रशासनाच्या सहकार्याने मतदार जनजागृती मोहिमेत सहभागी होण्याची तयारी दर्शविली आहे. आहार ही संस्था महाराष्ट्रातील सुमारे ८,००० हॉटेल्स, रेस्टॉरंट्स व परमिट रूम्सचे प्रतिनिधित्व करत असून, राज्यभरातील ६५ जिल्हा संघटनांशी संलग्न आहे. हॉटेल व रेस्टॉरंट क्षेत्राचा सार्वजनिक संपर्क लक्षात घेता, नागरिकांमध्ये मतदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी हा सहभाग महत्त्वपूर्ण ठरणार आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान केलेल्या मतदारांना आहार संघटनेशी संलग्न असलेल्या रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये विशिष्ट सवलत देण्यात येणार आहे, असे आहार संघटनेचे अध्यक्ष विजय शेट्टी यांनी सांगितले. मतदान हा लोकशाहीचा कणा असून, “मी समाजाचा एक जबाबदार घटक आहे” ही भावना नागरिकांमध्ये निर्माण करून, मतदानाद्वारे कर्तव्‍ये पूर्ण करणे हा या सर्व उपक्रमांचा केंद्रबिंदू आहे. मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ मध्ये मतदार सहभाग वाढविण्यासाठी प्रशासन, विविध शासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था व व्यावसायिक संघटना एकत्रितपणे कार्यरत असल्याचे सकारात्मक चित्र या माध्यमातून समोर येत आहे.

Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा