टाकाऊ कपड्यांतून साकारली कलाकृती; पंतप्रधान मोदीचं ६ फूट पोर्ट्रेट चर्चेत

ब्रह्मपूर (ओडिशा):येथील तरुण फॅशन डिझायनर्सनी आपल्या कल्पकतेतून आणि परिश्रमातून एक अनोखी कलाकृती साकारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भव्य पोर्ट्रेट तयार केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे पोर्ट्रेट जुन्या व टाकाऊ कपड्यांपासून पूर्णपणे हाताने शिवून बनवण्यात आले आहे. सुमारे १५ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर तयार झालेले हे पोर्ट्रेट ६ फूट उंच आणि ५ फूट रुंद आहे.

ब्रह्मपूर येथील जेडी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या कलाकृतीला “फॅब्रिक ऑफ रिस्पेक्ट” असे नाव देण्यात आले आहे. शहरातील विविध भागांमधून गोळा करण्यात आलेल्या कपड्यांचे लहान-लहान तुकडे एकत्र करून हे पोर्ट्रेट साकारण्यात आले. ब्रह्मपूरचे आमदार के. अनिल कुमार यांच्या उपस्थितीत या पोर्ट्रेटचे औपचारिक अनावरण करण्यात आले. यावेळी त्यांनी पुनर्वापर केलेल्या कपड्यांपासून पंतप्रधानांचे पोर्ट्रेट तयार करण्याचा हा देशातील पहिलाच प्रयोग असल्याचे सांगितले. इन्स्टिट्यूटचे संचालक आशिष रंजन सबत यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पोर्ट्रेट तयार करण्यासाठी तीन स्वतंत्र टीम तयार करण्यात आल्या. पहिल्या टीमने शहरातील शिवणकाम केंद्रांमधून जुने कपडे गोळा केले. दुसऱ्या टीमने ते कापड कापून, वर्गीकरण करून इस्त्री केली. त्यानंतर तिसऱ्या टीमने कपड्यांचे तुकडे पूर्णपणे हाताने शिवून प्रतिमेत बसवले. या प्रक्रियेत गोंद किंवा रंगांचा कोणताही वापर करण्यात आलेला नाही.

विद्यार्थ्यांनी दिवसाला ८ ते १० तास काम करत कपड्यांचे छोटे पिक्सेलसारखे तुकडे करून पंतप्रधानांच्या प्रतिमेची अचूक रचना उभी केली. साध्या कापडांपासून ते पारंपरिक संबलपुरी वस्त्रांपर्यंत विविध प्रकारच्या कापडांचा वापर या पोर्ट्रेटमध्ये करण्यात आला आहे.
Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी