Viral Video :चालत्या बाईकवर 'हायव्होल्टेज' ड्रामा!...लोक पाहत राहिलीत..!

मुंबई: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, पण सध्या एका अशा व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे जो पाहून अनेकांच्या हसु येईल. नवरा-बायकोच्या नात्यात भांडणं होणं ही सामान्य बाब आहे, मात्र भररस्त्यात चालत्या बाईकवर एका पत्नीने आपल्या पतीची ज्या प्रकारे 'धुलाई' केली, ते पाहून सर्वत्र चर्चा रंगली आहे.


नेमकं काय घडलं?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक पती व पत्नी बाईकवरून जाताना दिसत आहे. पती गाडी चालवत आहे आणि पत्नी मागे बसली आहे. मात्र, अचानक पत्नीचा पारा चढतो आणि ती मागे बसल्या बसल्या पतीवर थपडांचा पाऊस पाडण्यास सुरुवात करते. संतापलेल्या या पत्नीने कमीत कमी पतीला तब्बल १४ कानाखाली लगावल्या. धक्कादायक बाब म्हणजे, गाडी वेगात असतानाही पत्नीने मारणे थांबवले नाही, ज्यामुळे बाईकचा तोल जाऊन मोठा अपघात होण्याची शक्यता होती.


या व्हिडीओमधील सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे पतीचा प्रतिसाद आला नाही. पत्नी इतक्या जोरात आणि सलग मारत असतानाही, पतीने मागे वळून पाहिले नाही किंवा तिला प्रतिकार केला नाही. तो शांतपणे गाडी चालवत मार सहन करत राहिला. जणू काही त्याने आपल्या चुकीची कबुलीच दिली होती. सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की, या पतीने आपल्या पत्नीची फसवणूक केली होती किंवा तिला तो दुसऱ्या एका महिलेसोबत दिसला होता. याच संतापामुळे पत्नीने भररस्त्यात त्याचा'हिशोब' चुकता केला.


सोशल मिडियावर व्हिडीओ वायरल


हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी यावर मजेशीर आणि काहीशा गंभीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. "हा नवरा आहे की दगड? इतका मार खाऊनही गाडी कशी काय चालवतोय?" अशी विचारणा एका युजरने केली आहे. तर दुसऱ्याने "हे तर खरं 'बॅलन्सिंग' आहे," अशी टर उडवली आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने