Raj Thackeray : भावाशी युती करूनही राज ठाकरेंच्या खात्यात २२ शून्य, मुंबईत 'मनसे'ला जबरदस्त धक्का; ठाकरे ब्रँड फेल!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेसाठी २० वर्षांचा वनवास संपवून एकत्र आलेल्या 'ठाकरे बंधूं'साठी आजचा निकाल धक्कादायक ठरताना दिसत आहे. मतमोजणीच्या ताज्या कलानुसार, शिवसेना (उबाठा) आणि मनसेच्या युतीला मुंबईकरांनी नाकारल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. एकीकडे भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुतीने बहुमताच्या दिशेने वेगाने वाटचाल केली असताना, दुसरीकडे राज ठाकरे यांची मनसे केवळ काही मोजक्याच जागांवर अडकली आहे. विशेष म्हणजे चुलत भाऊ उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करूनही राज ठाकरे यांना मुंबईत आपली छाप पाडता आलेली नाही.



महायुतीची निर्णायक मुसंडी


भारतीय जनता पक्षाने मोठी झेप घेतली असून, 'मिशन मुंबई' फत्ते करण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले आहे. २२७ जागांसाठी झालेल्या या अटीतटीच्या लढतीत भाजपने तब्बल ८८ जागांवर आघाडी घेत मुंबईतील सर्वात मोठा पक्ष म्हणून आपले स्थान भक्कम केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेही २८ जागांवर आघाडी मिळवत महायुतीची ताकद वाढवली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उबाठा) गटाने दिलेले कडवे आव्हान मोडीत काढत, मुंबईकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या 'डबल इंजिन' सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे.



मनसेला मोठा फटका


मराठी माणसाच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेचे या निवडणुकीत अक्षरशः पानिपत झाले आहे. राज ठाकरे यांनी यंदा उद्धव ठाकरे यांच्याशी हातमिळवणी करत मुंबईत 'मराठी कार्ड' खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सुरुवातीच्या निकालानुसार मनसेला केवळ ५ जागांवर समाधान मानावं लागत असल्याचं दिसत आहे. २०१७ च्या निवडणुकीत मनसेचे ७ नगरसेवक निवडून आले होते, यंदा युती करूनही ही संख्या वाढताना दिसत नाहीये. राज ठाकरे यांची सभा आणि संवाद यांचा प्रभाव मतपेटीतून उमटला नसल्याचे चित्र आहे.



प्रमुख शहरांमधील मनसेची पीछेहाट


राज ठाकरे यांच्या पक्षाला अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये खातेही उघडता आलेले नाही. पुण्यात १६५ जागांपैकी १२२ जागांचे कल हाती आले असून तिथे मनसेला एकही जागा मिळालेली नाही. ठाणे, नवी मुंबई आणि उल्हासनगरमध्ये मनसेला प्रत्येकी केवळ १ जागा मिळाली आहे. नाशिकमध्ये २ तर अहिल्यानगरमध्ये ३ उमेदवार आघाडीवर आहेत. कल्याण डोंबिवलीत १२२ जागांपैकी मनसेला केवळ ४ जागांवर आघाडी मिळवता आली आहे. याशिवाय नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि सोलापूरसह एकूण २२ शहरांमध्ये मनसेचा पूर्णपणे सफाया झाला आहे.



कोणत्या शहरात मनसेचा सफाया?


ज्या २२ शहरातील महानगपालिका निवडणुकीत मनसेला खातं उघडता आलेलं नाही, त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर, सांगली-मिरज-कुपवाड, सोलापूर, मालेगाव, जळगाव, धुळे, इचलकरंजी, नांदेड, लातूर, परभणी, जालना, अमरावती, अकोला आणि चंद्रपूर या महानगरपालिकांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर