भारतीय बाजारात अ‍ॅपल मोठ्या संकटात? गुप्त अहवालात मोठी माहिती उघड

प्रतिनिधी: भारतीय बाजारात अ‍ॅपल कंपनी नव्या संकटात सापडली आहे. भारतीय स्पर्धा आयोग (Competition Commision of India) या नियामक मंडळाने अ‍ॅपल कंपनीच्या विरोधात अनैतिक कार्यपद्धतीविरोधात चौकशी सुरु केली होती. कंपनीविरोधात अ‍ॅपलकडून आय स्टोअर्स अ‍ॅप डेव्हलपरकडून अव्वाच्या सव्वा ३०% कमिशन घेतले जात असल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. आलेल्या तक्रारीनंतर कंपनीबाबत चौकशी तेजीत सुरू करण्यात आली परंतु वारंवार नोटीस बजावली असतानाही चौकशीला सामोरे जाण्यासाठी अथवा तारखा पुढे ढकलण्यासाठी कथित प्रकरणातील आरोपी अ‍ॅपल कंपनीला अंतिम ताकीद नियामक मंडळाने दिली आहे.


आपल्या आदेशात स्पष्ट करताना आयोगाने 'स्पष्ट निर्देशांनंतरही वारंवार दिलेल्या मुदतवाढीमुळे कार्यपद्धतीतील शिस्त बिघडते आणि कार्यवाहीच्या वेळेवर निष्कर्षात अडथळा येतो' असे म्हटले होते. जर हा गुन्हा सिद्ध झाला तर कंपनीला भारतात सुमारे ३८ अब्ज डॉलर दंड भरावा लागेल असे सांगण्यात येत आहे. कंपनीने (Apple) मात्र वेळोवेळी मक्तेदारीच्या आरोपांचे खंडन करण्यात आले. पण सुत्रांच्या माहितीनुसार कंपनीने दिल्ली न्यायालयात धाव घेतली असून या प्रकरणाची तसदी घेऊन उचित दखल द्यावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत तशी धाव कंपनीने न्यायालयात घेतली असून दिल्ली उच्च न्यायालयात त्या आव्हानाची सुनावणी सुरू असतानाच आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार भारतीय स्पर्धा आयोगाच्या (CCI) ३१ डिसेंबरच्या एका गोपनीय आदेशातून असे दिसून येते की, दंडाच्या नियमांसंबंधीचा वाद न्यायालयात प्रलंबित असताना ॲपलने संपूर्ण प्रकरण थांबवण्याची खाजगीरित्या विनंती केली होती. सीसीआयने ही विनंती फेटाळून लावली होती.


या नियामक संस्थेने सांगितले की, त्यांनी ऑक्टोबर २०२४ मध्ये ॲपलला चौकशीच्या निष्कर्षांवर आक्षेप नोंदवण्यास आणि दंड निश्चित करण्यासाठी सामान्यतः वापरले जाणारे आर्थिक तपशील सादर करण्यास सांगितले होते. परंतु तेव्हापासून कंपनीला वारंवार मुदतवाढ मिळत असतानाही कंपनीने टाळाटाळ केल्याचा आरोप नियामकांनी (CCI) केला.


त्यामुळे असा अनुनय अनिश्चित काळासाठी सुरू ठेवला जाऊ शकत नाही असेही आदेशात नमूद करण्यात आले असून ॲपलला अंतिम इशारा देण्यात आला आहे की, पुढील आठवड्यापर्यंत कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास, ते या प्रकरणात एकतर्फी कारवाई करतील. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या सुत्रांच्या माहितीनुसार, ॲपल सीसीआयच्या डिसेंबरमधील आदेशाकडे सध्या सुरू असलेल्या न्यायालयीन कार्यवाहीला टाळत आहे. २७ जानेवारी रोजी न्यायाधीश यावर सुनावणी घेण्यापूर्वी कंपनी त्यावर प्रतिसाद देण्याची शक्यता नाही. आर्थिक वर्ष २०२२ पासून, टिंडरची मालक असलेली मॅच (MTCH.O) आणि भारतीय स्टार्टअप्स कंपन्या ॲपलसोबत एका मक्तेदारीविरोधी कायदेशीर लढाई लढत आहेत. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये तपासकर्त्यांनी एक अहवाल जारी करून म्हटले होते की, या अमेरिकन स्मार्टफोन कंपनीने आयओएस ॲप्सच्या बाजारपेठेत गैरवर्तन केले आहे.

Comments
Add Comment

Lakme Fashion Week : लडाखच्या 'पश्मिना' आणि पारंपरिक हस्तकलेचा नवी दिल्लीत डंका!

नवी दिल्ली : लडाखचे जगप्रसिद्ध 'पश्मिना' (Pashmina), सुंदर शाली आणि तिथल्या हाताच्या अप्रतिम कलाकुसरीची जादू सध्या

Skin Treatment : सणासुदीच्या काळात त्वचेला ग्लो देण्यासाठी 5 खास स्किन ट्रीटमेंट्स; जाणून घ्या कधी कराव्यात?

दिवाळीत त्वचेवर नैसर्गिक चमक आणि ग्लो मिळवण्यासाठी सणांच्या काही दिवस आधी योग्य स्किन ट्रीटमेंट्स घेणे

जनाब संजय राऊत माफीवीर! भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा हल्लाबोल; महाराष्ट्रासह देशातील जनतेचीही माफी मागण्याची मागणी

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाची माफी मागण्याच्या मुद्द्यावरून भाजपने उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका

Rajgira Kheer : नवरात्रीच्या उपवासात थकवा जाणवतोय ? दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी ट्राय करा ही चवदार राजगिरा खीर.

  [caption id="attachment_1066892" align="aligncenter" width="850"] राजगिरा, दूध, बदाम आणि ड्रायफ्रूट्सचा हा परफेक्ट संगम तुमच्या उपवासाचा उत्साह

Bengaluru Metro : मेट्रो ठरली जीवनदायिनी! बंगळुरूमध्ये 18 मिनिटांत मानवी हृदयाची यशस्वी वाहतूक, Video Viral

बंगळूर :  बंगळूर शहरातील वाहतूक कोंडीमुळे अनेकदा रुग्णालयात पोहोचण्यास विलंब होतो. मात्र, बंगळूरच्या नम्मा

"अखेर मनातलं ओठांवर आलंच, हा सगळा खेळ..."; प्रशांत भूषण यांचा व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल

मुंबई: सीजेपी आणि विरोधी पक्षांकडून दिल्लीत सुरू असलेले आंदोलन म्हणजे सत्तेसाठी सुरू असलेला खेळ आहे, असा