मुंबई महापालिकेत ५० माजी नगरसेवकांचे नातेवाईक

यापूर्वी नगरसेवक भूषवलेल्या माजी नगरसेवकांचे निवडून आलेले नातेवाईक


सचिन धानजी मुंबई : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आरक्षणात अनेकांना आरक्षणाचा फटका बसला आणि त्यामुळे मग कुणाला पत्नीला निवडणूक रिंगणात उतरावे लागले तर कुणाच्या पतीला, तर कुणाच्या मुलीला तर कुणाच्या अन्य नातेवाईकांना उमेदवारी मिळवत आपला गड कायम राखण्याचा प्रयत्न करावा लागला. त्यामुळे पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर अनेकांनी आपले गड कायम राखत विजय मिळवला. त्यामुळे महापालिका सभागृहात मागील निवडणुकीत निवडून आलेल्या माजी नगरसेवकांचे नातेवाईकांचा प्रवेश झाला. मुंबई महापालिकेत अशाप्रकारे माजी नगरसेवकांचे सुमारे ५० नातेवाईक निवडून आले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात माजी नगरसेवकांचे नातेवाईक उतरले. यातील काही नातेवाईक विजयी झाले तरी काहींना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे काही माजी नरसेवकांना सभागृहात येण्याचे भाग्य लाभले नाही. परिणामी आपले गड काही माजी नगरसेवकांना गमवण्याची वेळ आली आहे.


शिवसेना : १०
दीक्षा हर्षद कारकर, डॉ. अदिती भास्कर खुरसुंगे, वर्षा स्वप्निल टेंबवलकर, रितेश कमलेश राय, शैला दिलीप लांडे, मिनल संजय तुर्डे, मानसी मंगेश सातमकर, वनिता दत्ताराम नरवणकर, यामिनी यशवंत जाधव, सुरेश आवळे


भाजप : १३
दक्षता श्रीकांत कवठणकर, मनिषा कमलेश यादव, तेजिंदर सतनाम तिवाना, ममता पंकज यादव, दिशा सुनील यादव, जगदिश्वरी जगदिश अमीन, अंजली अभिजित सामंत, अनिता नंदकुमार वैती, दिनेश बबलू पांचाळ, कशिश राजेश फुलवारिया, रोहिदास लोखंडे, गौरवी शिवलकर नार्वेकर, अजय किसन पाटील


उबाठा : १५
अंकित सुनील प्रभू, जीशान चंगेश मुलतानी, सबा हारुन खान, गितेश राऊत, शिवानी शैलेश परब, पूजा विश्वनाथ महाडेश्वर, श्रवरी सदा परब, सुनील सयाजी मोरे, स्वरपा तुकाराम पाटील, मिनाक्षी अनिल पाटणकर, अनिल लक्ष्मण कदम, निशिकांत गोविंद शिंदे, पद्मजा आशिष चेंबूरकर, योगिता प्रशांत कदम, राजोल पाटील


मनसे : ०१
सई सनी शिर्के,


राष्ट्रवादी काँग्रेस : ०१
बुशरा नदीम (कप्तान) मलिक,


समाजवादी पक्ष : ०१
अमरीन शेहझाद अब्राहनी,


काँग्रेस : ०७
अजंता यादव, राजा रहेबर सिराज, हैदर अली शेख डॉ. समन अरशद आझमी, आयेशा सुफियान वणू, साजिदाबी बब्बू खान, आशा दीपक काळे, नसीमा
जावेद जुनेजा

Comments
Add Comment

Versova Beach Dead Body : वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गोणीत सापडला मृतदेह; 6 आरोपींना अटक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर 1 ऑक्टोबर रोजी गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत