संत ज्ञानेश्वर

माझे जीवीची आवडी
माझे जीवीची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी ।।
पांडुरंगी मन रंगले । गोविंदाचे गुणी वेधले ।।
जागृति स्वप्न सुषुप्ति नाठवे । पाहतां रुप आनंदी आनंद साठवे ॥
बापरखुमादेविवरु सगुण निर्गुण । रुपविटेवरी दाविली खूण ।।


- डॉ. देवीदास पोटे


पंढरीची वारी ही वारकरी भक्ती मार्गातील महत्त्वाची परंपरा आहे. वारी हे मराठी संस्कृतीचे वैभव आहे. पंढरपूर हे भक्तीचे आद्यपीठ आहे. विटेवरचा विठ्ठल या भक्ती पिठाचा अधिपती आहे. भक्तीचा हा प्रवाह शतकानूशतके पंढरपूरच्या दिशेने नाम गजर करीत, नाचत, अभंग गात वारीच्या वाटेवर चालतो आहे. हा भक्तीचा सोहळा कधी न संपणारा आहे, अक्षय आहे.


या अभंगात संत ज्ञानेश्वर म्हणतात, “पंढरपूरला वारीबरोबर जाणे ही माझ्या मनाची मन:पूत आवड आहे. माझे मन पांडुरंगाच्या भक्तीरंगात बुडून गेले आहे. या गोविंदाच्या गुणांनी मनाला मोहून टाकले आहे. जागृत, अर्ध जागृत, आणि स्वप्न या तिन्ही अवस्थांचे भान हरपले असून विठ्ठलाचे सावळे रूप पाहताच मनात आनंदाच्या लाटा दाटून येतात. हा विठ्ठल जसा निर्गुण, निराकार आहे तसाच सगुण, साकार आहे. विटेवरचे त्याचे देखणे रूप ही सगुणपणाची खूण आहे.


पंढरपूरला जायचे तर वारीबरोबर पालखी व गुढी घेऊन. वारीची ही परंपरा संतांनी हजारो वर्षे अखंडितपणे सुरू ठेवली. वारीत समस्त वारकरी आपल्या परमदैवत असलेल्या विठ्ठलाला भेटण्यासाठी आंतरिक ओढीने चालत असतात. सर्वांचे ध्येय एकच असते ते म्हणजे विठू माऊलीला भेटणे. त्या सावळ्या परब्रह्माला आपल्या नेत्रांत, तनमनात साठवून ठेवणे.
‘पंढरपुरा नेईन गुढी’ या ओळीत वर्णन केलेली गुढी सामाजिक समतेची, बंधूतेची, भक्तीची आहे. तशीच निखळ आनंदाचीआहे. टाळ-मृदंगाचा ध्वनी, वीणेचा झणकार मनावर सात्विक आनंद लहरींची शिंपण करतो. ज्ञानोबा-तुकाराम हा नामगजर, कीर्तन, भारुड या सर्व प्रकारातून मनाला अपार आनंद आणि अपार भक्ती सुख मिळते.


पंढरपूरच्या अंतरीच्या अत्यंत ओढीने भक्तीची गुढी व पताका घेऊन पंढरपूरला जाण्याचा निर्धार संत ज्ञानेश्वर या अभंगातून व्यक्त करतात. त्यांनी उभारलेली ही गुढी भक्तीची आहे तशीच ती ज्ञानाची आहे, प्रेमाची आहे, समतेची आहे, आनंदाची आहे आणि धन्यतेची अनुभूती देणारी आहे. ज्ञानदेव-नामदेव आणि इतर वारकरी संतांनी रुजवलेली वारीची ही परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे. ती अनंत काळपर्यंत अशीच सुरू राहणार आहे. विठ्ठल भक्तीची ज्योत जागवीत...!

Comments
Add Comment

Kanya Pujan 2026: कन्या पूजनसाठी 9 कन्या मिळाल्या नाही तर काय करायचं? काय सांगतं शास्त्र

शारदीय नवरात्री सुरू असून देवीच्या नऊ रुपांची मोठ्या भक्तिभावाने पूजन केलं जात आहे. या दरम्यान कन्या पूजनचं

Navratri 2026: शारदीय नवरात्री का साजरी केली जाते? चैत्र नवरात्रीपेक्षा नेमकं काय वेगळं? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मात नवरात्रीचं विशेष महत्व आहे. या नऊ दिवसात देवीच्या नऊ रुपांची मनोभावे पूजा केली जाते. तसं पाहिलं तर

Navratri Kalash: नवरात्रीच्या कलशात काय टाकावं? तुम्ही ही चूक तर करत नाही ना!

शारदीय नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. पितृपक्ष संपला की दुसऱ्या दिवशी घटस्थापना होते. अश्विन महिन्यातील

Sarvapitru Amavasya 2026 : पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहित नाही, ‘हा’ दिवस ठरणार महत्त्वाचा ! संपूर्ण पितृपक्षाचं पुण्य मिळवण्याची विशेष संधी

Sarvapitru Amavasya 2026 : हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील शेवटची तिथी म्हणजेच

Navratri Festival : यंदा नवरात्रीत अष्टमी-नवमी एकाच दिवशी, जाणून घ्या घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंतच्या महत्त्वाच्या तारखा

Navratri Festival : नवरात्रोत्सवाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भाविकांसाठी यंदाचं नवरात्र विशेष ठरणार आहे. देवीच्या नऊ

Navratri 9 Days Colours 2026: नवरात्रीच्या ९ दिवसांचे रंग कोणते ? पाहा संपूर्ण यादी

Navratri 9 Days Colours 2026: शारदीय नवरात्रौत्सवाला यंदा ११ ऑक्टोबर २०२६ पासून सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये