Mumbai Bellasis Bridge : मुंबई सेंट्रल परिसरातील वाहतुक कोंडीला दिलासा;मुंबई सेंट्रलमधील हा ब्रिज सुरु होणार...

मुंबई: मुंबई सेंट्रल परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्याच्या दृष्टिकोनातून मुंबईकरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. ताडदेव–नागपाडा आणि मुंबई सेंट्रल स्थानकाला जोडणारा बेलासिस उड्डाणपूल येत्या २६ जानेवारीपासून म्हणजेच प्रजासत्ताक दिनी वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. अवघ्या १५ महिने आणि सहा दिवसांत या पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याने महापालिका आणि मध्य रेल्वेच्या यशस्वी समन्वयाचे हे कौतुकस्पद उत्तम उदाहरण मानले जात आहे. .

मुंबई सेंट्रल स्थानकाजवळील ब्रिटिशकालीन जुना बेलासिस पूल धोकादायक घोषित करण्यात आले होते त्यांनंतर त्या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले होते. सप्टेंबर २०२४ मध्ये या प्रकल्पाचे कंत्राट देण्यात आले, तर १ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. निविदेनुसार पुलाच्या कामासाठी अजून चार महिन्यांची मुदत शिल्लक असतानाच हे काम वेळेआधी पूर्ण करण्यात आले आहे. महापालिकेचा पूल विभाग आणि मध्य रेल्वेच्या अभियंत्यांनी सुरुवातीपासूनच काटेकोर नियोजन करत कामाची विभागणी केली. रेल्वे रुळावरील कामे मध्य रेल्वेने पूर्ण केली, तर गर्डरचे मजबुतीकरण, स्लॅब कास्टिंग, पुलाचा पृष्ठभाग आणि पोहोच मार्गाची कामे महापालिकेने पार पाडली.

या प्रकल्पादरम्यान बेस्ट वाहिन्यांचे स्थलांतर, अडथळा ठरणारी १३ बांधकामे हटवून पुनर्वसन, एका गृहनिर्माण संस्थेची सीमाभिंत हटवणे तसेच उच्च न्यायालयातील खटल्यासारखी आव्हाने समोर आली. मात्र, सर्व अडचणींवर मात करत कामात कोणताही विलंब होऊ दिला गेला नाही, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.
Comments
Add Comment

मध्य रेल्वेचा कसारा येथे मेगाब्लॉक; 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवांवर मोठा परिणाम

मुंबई : मध्य रेल्वेवर आसनगाव - कसारा तिसरी मार्गिका प्रकल्प आणि कसारा यार्डमधील 'अप' यार्ड लाईन विस्तारीकरणाच्या

Mumbai Railway Megablock: प्रवाशांनो कृपया लक्ष असुद्या! रविवारी तीन मार्गिकेवर 'मेगा ब्लॉक'; जाणून घ्या सर्व अपडेट

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार दिनांक 18 ऑक्टोबर

BMC News : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पासाठी मोठी कारवाई! मुलुंडमध्ये आणखी २१५ बांधकामे हटवली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडून उपनगरांतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या

संविधानाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे ही काळाची गरज, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

मुंबई (विशेष प्रतिनिधी): भारतीय संविधान हे केवळ एक दस्तऐवज नसून त्यातील तत्वे प्रत्यक्ष जीवनात उतरविणे महत्चसचे

वैद्यकीय तज्ज्ञांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिले आरोग्याचे धडे, ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमाला तरूण- तरूणींचा उत्सफुर्त प्रतिसाद

मुंबई: बदलती जीवनशैली, मोबाईलचा वाढता वापर, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि मानसिक ताण या वेगवेगळ्या

मुंबईत दीड वर्षांच्या मुलीला सहाव्या मजल्यावरून ढकललं, आरोपीच्या आईनं पुरावे नष्ट करण्यासाठी वापरली शक्कल

मुंबई: मुंबईतल्या गोरेगाव पूर्वेतील दिंडोशी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोरेगाव पूर्वेतील