मुंबई कोस्टल रोड पूर्ण, सहा महिन्यांनी अभियंत्यांच्या पाठीवर आयुक्तांची कौतुकाची थाप

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पात महानगरपालिकेचे अधिकारी आणि अभियंत्यांचा मोलाचा वाटा आहे. या अधिकारी आणि अभियंत्यांना महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते बुधवारी २१ जानेवारी २०२५ रोजी प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.


मुंबई महानगरपालिका मुख्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उप आयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उप आयुक्त (पायाभूत सुविधा) गिरीश निकम, प्रमुख अभियंता (मुंबई किनारी रस्ता प्रकल्प) (अतिरिक्त पदभार) मंतय्या स्वामी, सहायक आयुक्त शंकर भोसले आदींसह मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे अभियंते उपस्थित होते.


शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपूल ते वरळी-वांद्रे सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाची लांबी १०.५८ किलोमीटर इतकी आहे. नागरिकांच्या सोयीसाठी सदर रस्ता टप्याटप्याने १२ मार्च २०२४ पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तसेच १५ ऑगस्ट २०२५ पासून सर्व मार्गिका पूर्णवेळ खुल्या करण्यात आल्या आहेत.


मुंबईसारख्या गतिमान शहरातील प्रवासाचा कालावधी कमी करणे, इंधनाची बचत साधणे तसेच वायूप्रदूषणात घट घडविणे असा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. या माध्यमातून शहरातील वाहतुकीची गती व एकूणच शहरी गतिशीलता आणखी सुधारण्याचे लक्ष्य साध्य करण्यात आले.


हा प्रकल्प हा मुंबई महानगरपालिकेचा प्रतिष्ठित, महत्त्वाकांक्षी आणि बहुविध घटकांचा समावेश असलेला पायाभूत सुविधा उपक्रम आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित अधिकारी व अभियंते यांनी प्रकल्पाच्या नियोजन, अभिकल्पना, समन्वय आणि बांधकाम या सर्व टप्प्यांमध्ये प्रदर्शित केलेल्या तांत्रिक कौशल्य, अभिनव अभियांत्रिकी उपाययोजना आणि अखंड कार्यनिष्ठा यांचे फलित म्हणजे हा प्रकल्प आहे.


वरील प्रकल्पाशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान प्रदर्शित केलेली कार्यनिष्ठा, जबाबदारीची जाणीव आणि उत्कृष्ट समन्वय लक्षात घेता महानगरपालिका आयुक्तांनी सर्व अभियंत्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.


यावेळी चंद्रकांत कदम, भूपेंद्र राठोड, ऋषिकेश पाटील, अर्चना रामगिरी, डॉ. विशाल ठोंबरे, संदीप चौरे, प्रशांत जगताप, विजय जोरे, प्रणव जगदाळे, श्री. अमित सिंग, निखिल मालुंजकर, नितेश चौधरी, आशीष फुलझेले, जयेश फंदाडे, प्रणाली भोसले आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने