बाळासाहेब ठाकरेंनी टीका केलेल्या सोनिया गांधी राऊतांना वंदनीय झाल्या का ?

भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा परखड सवाल 


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, आनंद दिघे वंदनीय आहेत. संजय राऊत तुम्हाला नेमकं कोण वंदनीय आहे असा परखड सवाल भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी मंगळवारी केला. ज्या सोनिया गांधी यांच्यावर करप्शन क्वीन म्हणून स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी टीका केली होती, त्या सोनिया गांधी उबाठा गट आणि राऊतांसाठी वंदनीय झाल्या आहेत. राहुल गांधी, एमआयएम हे राऊतांसाठी परमपूज्य झाले आहेत अशी बोचरी टीकाही श्री. बन यांनी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोण कुणाचे अंगवस्त्र आहे यावर हीन भाषेत बोलण्याऐवजी सत्यस्थिती काय आहे हे जनतेला ठाऊक आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची गुलामी करण्या पलिकडे उद्धव ठाकरे आणि राऊतांनी काहीही केले नाही असेही श्री. बन म्हणाले.
जनतेने उबाठा गटाला घरी बसवले आहे. मुंबईत भाजपा महायुतीचाच महापौर होईल याचा पुनरुच्चार करत श्री. बन म्हणाले की उद्धव ठाकरे आणि राऊतांनी मुंबईमध्ये एमआयएम किंवा काँग्रेसचा महापौर केला असता. आपल्या पक्षाची अगरबत्ती कुठे विझली आणि कोणामुळे विझली याचा विचार राऊतांनी केला तर बरे होईल अशी कोपरखळीही श्री. बन यांनी मारली.
उद्योगमंत्री उदय सामंत एका मोठ्या गटासह भाजपा मध्ये चालले आहेत या राऊतांच्या मुक्ताफळांचा खरपूस समाचार घेत श्री.बन म्हणाले की, राऊतांनी कुडमुड्या ज्योतिषाप्रमाणे भविष्यवाणी करणे सोडावे. तुमचे 40 आमदार उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराला वैतागून गेले. ना जनता ना कार्यकर्ते ना आमदार ना मंत्री कोणालाही मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे भेटत नव्हते. त्यामुळेच 40 आमदार उबाठांना सोडून दिले याचे स्मरण श्री. बन यांनी करून दिले.

कोश्यारी यांच्या पद्म पुरस्कारवरून राऊतांचे हीन राजकारण

भगतसिंह कोश्यारींना त्यांच्या कार्यकर्तृत्वावर पद्म पुरस्कार मिळाला आहे. मात्र श्री.कोश्यारी यांनी राज्यपाल पदाचा कारभार चोखपणे वठवताना महाराष्ट्रातील तत्कालिन भ्रष्ट उबाठा सरकारवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला होता. म्हणूनच श्री.कोश्यारींना पद्म पुरस्कार घोषित झाल्यावर राऊतांच्या पोटात दुखत आहे. श्री. कोश्यारींनी महाराष्ट्राचा अपमान केला नाही तर द्रोह करून सत्ता मिळवणा-या उद्धव ठाकरेंच्या चुकीच्या कारभारावर वारंवार बोट ठेवल्यामुळे उद्धव आणि राऊतांचा अहंकार दुखावला होता. देवेंद्र फडणवीस यांनी कधीही कोश्यारी यांच्या चुकीच्या वक्तव्यांबाबत समर्थन केले नाही. मात्र सातत्याने श्री. कोश्यांरींच्या वक्तव्यांचा विपर्यास करण्याचा प्रयत्न सत्तेत असताना उबाठा गट आणि राऊतांनी केला होता याची आठवण श्री, बन यांनी करून दिली.

आदिवासी आंदोलनाला फूस देण्याची उबाठा गटाची खेळी

भाजपाने नेहमीच आदिवासींच्या जल, जमीन आणि जंगल हक्कांचे संरक्षण करण्यावर भर दिला. संजय राऊत आणि उबाठा गट मात्र केवळ आगीत तेल ओतण्याचे काम करतात. आदिवासी आंदोलनाला फूस देण्याची खेळी उबाठा गटाकडून खेळली जात आहे असा घणाघात श्री. बन यांनी केला.

फडणवीस, शिंदे मैदानात, उद्धव ठाकरे घरात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघेही 24 तास महाराष्ट्रासाठी आणि जनहितासाठी झटत आहेत. उद्धव ठाकरे यांना आता नेमके काय काम आहे? कंपाउंडर राऊतांसारखेच डब्ल्यूएचओ चे ते सल्लागार म्हणून कारभार सांभाळतात का असे सवाल श्री. बन यांनी केले.
Comments
Add Comment

Prime Video Chaar Yaar : प्राइम व्हिडिओच्या ‘चार यार’चा ट्रेलर प्रदर्शित; २००० च्या दशकातील मुंबईत उलगडणार गुन्हेगारी आणि मैत्रीची अनोखी कहाणी!

एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल्ससाठी ओळखली जाणारी भारतातील आघाडीची स्ट्रीमिंग सेवा प्राइम व्हिडिओने आज आपल्या आगामी

Versova Beach Dead Body : वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गोणीत सापडला मृतदेह; 6 आरोपींना अटक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर 1 ऑक्टोबर रोजी गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

पुरूष क्रिकेटपटूंनाही जे जमलं नाही, ते स्मृती मंधाना करणार! फक्त 133 धावा करताच रचणार ऐतिहासिक महाविक्रम

[caption id="attachment_1066855" align="aligncenter" width="800"] भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 16 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या

Nashik News : सरकारी कार्यालयातच महिला अधिकाऱ्याने संपवलं जीवन , नाशिकमध्ये खळबळ

Malegaon News : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मालेगाव शहरातील सहकार निबंधक कार्यालयातील

Rajya Natya Spardha : राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांना २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धांना

Gold Silver Rate Today : सोनं-चांदीच्या दरात पुन्हा घसरण ! ऐन सणासुदीच्या काळात ग्राहकांना दिलासा

Gold Silver Rate Today : सोनं आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जळगावच्या