नवी मुंबई विमानतळाला मुंबई विमानतळाशी मेट्रोने जोडणार

महायुती सरकारचा निर्णय; 'मेट्रो-८'च्या जोडणीस मान्यता, २२ हजार ८६२ कोटींचा खर्च अपेक्षित


मुंबई : जगातील प्रमुख विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाला मेट्रोने जोडण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा मेट्रो लाईन ८ चा मार्ग उभारण्यास मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मंगळवारी मान्यता देण्यात आली असून, या प्रकल्पामुळे दोन्ही विमानतळांदरम्यानचा प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत पायाभूत सुविधांशी संबंधित विविध प्रकल्पांबाबत महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले.

'मेट्रो लाईन ८'ची एकूण लांबी ३५ किलोमीटर असून, त्यापैकी ९.२५ किलोमीटर मार्ग भूमिगत तर २४.६३६ किलोमीटर मार्ग उन्नत स्वरूपाचा असणार आहे. या मार्गावर एकूण २० स्थानके प्रस्तावित असून, त्यामध्ये ६ भूमिगत आणि १४ उन्नत स्थानकांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २ स्थानक ते घाटकोपर पूर्वपर्यंतचा मेट्रो मार्ग भूमिगत असणार आहे, तर घाटकोपर पश्चिम स्थानकापासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २ स्थानकापर्यंतचा मार्ग उन्नत स्वरूपाचा असेल. दोन स्थानकांमधील सरासरी अंतर १.९ किलोमीटर इतके ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ३०.७ हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता असून, त्यासाठी ३८८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एकूण २२ हजार ८६२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे.

........
समृद्धी महामार्गाच्या विस्तारित कामांना गती

समृद्धी महामार्गाच्या विस्तारित नागपूर–गोंदिया तसेच भंडारा–गडचिरोली महामार्गाच्या कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले. सर्व पायाभूत प्रकल्पांची कामे विहित कालावधीत पूर्ण करण्यात यावीत आणि कोणताही प्रकल्प रेंगाळू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो लाईन ८ संदर्भातील भूसंपादनासह सर्व प्रकारच्या मंजुरीची कामे पुढील सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यानंतर हा प्रकल्प पुढील तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच सर्व आवश्यक परवानग्या प्राप्त करून घेण्यावर भर देण्यात आला आहे.
.......
नाशिक शहर परिक्रमा मार्ग गतिमान

- याच बैठकीत कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर परिक्रमा मार्गाला गती देण्यास मान्यता देण्यात आली. या मार्गाची एकूण लांबी ६६.१५ किलोमीटर असून, या प्रकल्पासाठी ३ हजार ९५४ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
- तसेच गडचिरोली जिल्ह्यातील खनिज वाहतुकीसाठी नवेगाव मोरे–कोनसरी–मूळचेरा–हेदरी–सुरजागड या ८५.७६ किलोमीटर लांबीच्या महामार्गाच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. हा महामार्ग चार पदरी सिमेंट काँक्रिटकरणाचा असणार असून, त्यामुळे औद्योगिक आणि खनिज वाहतूक अधिक सुलभ होणार आहे.
Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने