वांद्र्यात वाहतुकीची गर्दी टाळण्यासाठी पादचाऱ्यांना स्कायवॉकचा पर्याय

मुंबई : वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील वेड्या वाकड्या उभ्या केलेल्या रिक्षा, कचऱ्याचे साम्राज्य तसेच चालण्यास योग्य पदपाथ नसल्याने एकमेकांवर आदळत आपटत चालावे लागते. त्यामुळे रिक्षाशिवाय पर्याय नसल्याने चार पैसे खर्च करतानाच वाहतूक कोंडीत अधिक तास मोजावे लागण्याची वेळ आलेल्या नागरिकांची आता यातून सुटका होणार आहे. महापालिकेच्यावतीने वांद्रे (पूर्व) येथील वांद्रे न्यायालय, वांद्रे - कुर्ला संकुल , म्हाडा तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात ये -जा करणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी नवीन आकाश मार्गिका खुली करण्यात आली आहे. त्यामुळे आता वांद्र्यातून जिल्हाधिकारी कार्यालय, म्हाडा, न्यायालय तसेच शासकीय वसाहतींमध्ये राहणाऱ्यांना आता आकाशातून चालत घर गाठता येणार आहे.

मुंबई महापालिकेच्यावतीने वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक ते न्यायालय आणि म्हाडा कार्यालय याठिकाणी जाण्यासाठी आकाश मार्गिका अर्थात स्कायवॉकचे बांधकाम केले असून याचे लोकार्पण राज्याचे माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी अर्थात २६ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे. या लोकार्पण सोहळ्यास स्थानिक आमदार वरुण सरदेसाई, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगरआदी मान्यवर उपस्थित होते. या स्कायवॉकचे कामकाज विक्रमी वेळेत पूर्ण करणारे कार्यकारी अभियंता नामदेव रावकाळे, सहायक अभियंता प्रशांत जावळे, दुय्यम अभियंता अमित दसूरकर यांचा पालकमंत्री शेलार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कणेकर मार्गावरील गर्दी होणार कमी

रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलाशी थेट जोडणी असल्यामुळे तसेच पश्चिम द्रुतगती महामार्ग येथे सुरक्षित रस्ता ओलांडण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या आकाश मार्गिकेमुळे वांद्रे (पूर्व) परिसरातील पादचारी वाहतूक अधिक सुरक्षित होईल. प्रवासाचा वेळ वाचेल आणि अनंत काणेकर रस्त्यावरील गर्दी लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होईल. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील प्रचंड वाहतूक आणि अनंत काणेकर रस्त्यावरील गर्दीमुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना अडचणी व अपघाताचा धोका निर्माण होत होता. या पार्श्वभूमीवर पादचाऱ्यांसाठी सुरक्षित, सुलभ आणि वेळ बचत करणारी सुविधा म्हणून या आकाश मार्गिकेची उभारणी करण्यात आली आहे असे अॅड.आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.

स्कायवॉकची वैशिष्ट्ये

  1. आकाश मार्गिका एकूण ६८० मीटर लांबीची व सरासरी ५.४० मीटर रूंदीची

  2. पादचाऱ्यांच्या विविध ठिकाणांहून सहज प्रवेशासाठी ४ जिने

  3. सुलभ मार्गक्रमण करण्यासाठी २ स्वयंचलित सरकत्या जिन्यांची जोड

  4. सुरक्षितता आणि निगराणीसाठी १४ सीसीटीव्ही कॅमेरे

Comments
Add Comment

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी