Ajit Pawar Passed Away : विमान फिरलं आणि ...; प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरकाप उडवणारी घटना

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला आज बुधवार २८ जानेवारी रोजी बारामती येथे मोठा अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला असून अजून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अजित पवार यांचं विमान जळून खाक झाल्याचं समोर आलं आहे. मात्र अपघात नेमका कसा घडला याचे वर्णन प्रत्यक्षदर्शीने केले आहे.


असा झाला अपघात : 


अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला त्याठिकाणचे प्रत्यक्षदर्शीने धक्कादायक माहिती दिली आहे. "पहिल्यांदा ते विमान वरुन गेलं, त्यानंतर गावातून खालून विमान येत होतं. नंतर विमान फिरलं आणि खाली जमीनीला लागलं, तेव्हा मोठा स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर आमच्या घरापर्यंत विमानाचे तुकडे उडाले. विमान जागेवर फिरलं आणि लगेच स्फोट झाला." असं एका महिला प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.


जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामती दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला. नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (DGCA) दिलेल्या माहितीनुसार, या दुर्दैवी घटनेत विमानातील सर्व ६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

आज सकाळी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका सुरू करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत दाखल होणार होते. विमान धावपट्टीवर उतरत असताना तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात झाला. सुरुवातीला उपमुख्यमंत्री गंभीर जखमी असून त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, काही वेळातच DGCA कडून अधिकृत दुजोरा मिळाला की, अपघात इतका भीषण होता की विमानातील सहाही जणांनी आपले प्राण गमावले आहेत.


Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी