ईशान्य मुंबईत शिवसेनेचे वजन झाले कमी, उबाठाचे वाढले

भाजपच गड तरीही सावरु शकले नाही शिवसेनेला,


विक्रोळीत वाढवली आपली अधिक ताकद


सचिन धानजी मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना महायुतीमध्ये लढली असली तरी भाजपचा गड असलेल्या ईशान्य मुुबईत शिवसेनेची वाढलेली ताकद कमी झाली आहे. या निवडणुकीत ईशान्य मुंबईत शिवसेनेचे १२ नगरसेवक होते, ही संख्या कमी होवून आता ०४वर आली आहे. तर उबाठाची संख्या ०८एवढी होती, ती वाढून ११ झाली आहे. त्यामुळे ईशान्य मुंबईत शिवसेनेचे वजन कमी झाले असून उबाठाचे वजन वाढल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.


उत्तर पूर्व मुंबई अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघात मुलुंड, विक्रोळी, भांडुप, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व आणि मानखुर्द शिवाजी नगर हे सहा विधानसभा क्षेत्र येत असून या सर्व विधानसभांमध्ये ३९ नगरसेवक आहेत. त्यातील मागील वेळेस भाजप आणि शिवसेनेचे २५ नगरसेवक होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ही संख्या १९ एवढी झाली आहे. त्यामुळे महायुतीची संख्या ०६ने कमी झाली आहे. भाजपच्या नगरसेवकांची संख्या १३ होती ती आता वाढून १५ झाली आहे, तर शिवसेनेची संख्या १२ होती होती, कमी हाेवून ०४ एवढी झाली आहे. तर उबाठाची संख्या ०८ वरून ११ एवढी झाली आहे.


विशेष म्हणजे विक्रोळीत उबाठाचा जिथे एक नगरसेवक होता, तिथे आता त्यांचे ०४ नगरसेवक झाले आहेत.


तर भांडुप आणि घाटकोपर पश्चिममधील नगरसेवकांची संख्या कायमच राहिली आहे. या दोन्ही मतदार संघात मागे प्रत्येकी ३ नगरसेवक निवडून आले होते, ही संख्या आताही कायम आहे. तसेच मानखुर्द शिवाजी नगरमध्येही उबाठाचा एकमेव नगरसेवक होता, ही संख्या त्यांनी कायमच राखली आहे तर या मतदार संख्या शिवसेनेचे तीन नगरसेवक होते, ही संख्या कमी होवून आता एकवर आली आहे.


उत्तर पूर्व मुंबई


पूर्वी


भाजप : १३, शिवसेना : १२, उबाठा : ०८,काँग्रेस : ०१, समाजवादी पार्टी : ०५


उत्तर पूर्व मुंबई


आता


भाजप : १५, शिवसेना : ०४, उबाठा : ११,काँग्रेस : ०१, एमआयएम व इतर ०८

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर