भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाबाबत 'महाराष्ट्र पॅटर्न'चे सर्वोच्च न्यायालयाने केले कौतुक

अन्य राज्यांच्या उपाययोजनांवर ओढले ताशेरे


नवी दिल्ली :देशातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि नागरिकांना होणारे दंश या गंभीर विषयावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण, श्वान निवारा केंद्रांची उभारणी आणि शैक्षणिक संस्थांच्या आवारातून कुत्र्यांना हटवण्याबाबत विविध राज्यांनी केलेल्या उपाययोजना अपुऱ्या असल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले. सुनावणी दरम्यान महाराष्ट्र सरकारने सादर केलेल्या माहितीची न्यायालयाने दखल घेतली. महाराष्ट्रात या प्रश्नी तयार करण्यात आलेल्या 'ऑनलाईन डॅशबोर्ड' मॉडलचे सर्वोच्च न्यायालयाने कौतुक केले. तसेच "ही एक चांगली सुरुवात असून इतर राज्यांनीही महाराष्ट्राच्या या मॉडेलचे अनुकरण करावे," असेही सुचवले.सुनावणी दरम्यान महाराष्ट्र सरकारने सादर केलेल्या माहितीची न्यायालयाने दखल घेतली. "आम्ही एक 'ऑनलाईन डॅशबोर्ड' तयार केला असून त्याद्वारे कुत्र्यांचा चावा, लसीकरण, निर्बीजीकरण आणि पशुवैद्यकीय केंद्रांची रिअल-टाइम माहिती उपलब्ध होत आहे," असे महाराष्ट्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले. यावर न्यायालयाने समाधान व्यक्त करत, "ही एक चांगली सुरुवात असून इतर राज्यांनीही महाराष्ट्राच्या या मॉडेलचे अनुकरण करावे," असे सुचवले.


न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने विविध राज्यांच्या प्रतिज्ञापत्रातील त्रुटींवरून राज्यांवर खंडपीठाने ताशेरे ओढले. आसाममध्ये २०२४ मध्ये कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या १.६६ लाख घटना घडल्या, तर २०२५ च्या केवळ जानेवारी महिन्यातच २०,९०० गुन्हे नोंदवण्यात आले. एवढी भीषण स्थिती असूनही संपूर्ण राज्यात केवळ एकच श्वान केंद्र असल्याचे समजताच न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले. "ही आकडेवारी धक्कादायक आहे, राज्यातील यंत्रणा काय करत आहे?" असा सवाल खंडपीठाने उपस्थित केला.


झारखंड सरकारने गेल्या दोन महिन्यांत १.६ लाख कुत्र्यांचे निर्बीजीकरण केल्याचा दावा केला. यावर न्यायालयाने संशय व्यक्त करत म्हटले की, "एका वाहनातून दिवसाला किती कुत्रे पकडले जाऊ शकतात? हे आकडे पूर्णपणे बनावट वाटत आहेत." बिहारबाबतही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. ६ लाख कुत्रे असलेल्या राज्यात केवळ २० हजार निर्बीजीकरण होणे हे अत्यंत अपुरे असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयांच्या परिसरातून भटक्या कुत्र्यांना हटवून तिथे कुंपण घालण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. महामार्गावरून भटक्या जनावरांना हटवण्याच्या सूचनाही राज्यांना देण्यात आल्या आहेत. "ज्या राज्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात मोघम माहिती दिली आहे, त्यांना आम्ही सोडणार नाही. आम्ही राज्य सरकारांविरुद्ध कडक टिप्पणी करू," असा सज्जड इशारा देत या प्रकरणाची या प्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवार दि. २९ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता होणार आहे.

Comments
Add Comment

Abhinandan Varthaman : पाकिस्तानी F-16 पाडणारे अभिनंदन वर्धमान आता नव्या भूमिकेत; भारतीय हवाई दलानंतर खासगी एअरलाइनमध्ये पायलट

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाचे माजी ग्रुप कॅप्टन आणि वीर चक्र विजेते अभिनंदन वर्धमान पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

BRICS Summit 2026 : ब्रिक्स परिषदेसाठी गुटेरेस भारतात येणार; पुतिन, पेजेशकियन आणि जिनपिंगही येण्याची शक्यता

नवी दिल्ली : भारताच्या यजमानपदाखाली होणाऱ्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेत संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो

malaria preventive medicine : मलेरिया प्रतिबंधात्मक औषध घेतल्याने 53 विद्यार्थी रुग्णालयात, 7 वर्षीय बालिकेचा मृत्यू

भद्राचलम : आंध्र प्रदेशातील पोलावरम जिल्ह्यातील गोल्लागुप्पा गावात मलेरियावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून

Ram Mandir Trust : निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा राम मंदिर ट्रस्टचे पहिले सीईओ नियुक्त

प्रशासकीय कामकाज अधिक मजबूत आणि सुव्यवस्थित करण्यासाठी, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने निवृत्त एअर

Kedarnath helicopter booking 2026 : केदारनाथ हेलिकॉप्टर सेवेसाठी ७ सप्टेंबरपासून बुकिंग विंडो उघडणार

डेहराडून : चारधाम यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात केदारनाथ धामला जाणाऱ्या भाविकांसाठी हेलिकॉप्टर सेवा १५

John Ternus Apple CEO : ‘ॲपल’मध्ये नव्या युगाची सुरुवात! नवीन CEO जॉन टर्नस आणि टिम कूक यांच्या पगाराचा आकडा जाहीर

दिग्गज तंत्रज्ञान कंपनी ‘ॲपल’ने (Apple) आपल्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर मोठा बदल केला असून टिम कूक (Cook)