मुंबईतील ९ विधानसभांमध्ये उबाठाचे 'शून्य' नगरसेवक

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष हा उबाठा ठरला असला तरी प्रत्यक्षात मुंबईतील ०९ विधानसभेत या पक्षाला नगरसेवकांचे खातेच उघडता आलेले नाही. त्यामुळे मुंबईतील ३६ विधानसभेच्या तुलनेत उबाठाला केवळ २७ विधानसभांमध्ये आपले नगरसेवक निवडून आणता आले आहेत. मुंबई पालिकेच्या निवडणुकीत भाजपचे ८९ आणि उबाठाचे ६५ नगरसेवक निवडून आले आहेत. तर शिवसेनेचे २९ आणि काँग्रेसचे २४ नगरसेवक निवडून आले. मात्र, मुंबईत ८९ नगरसेवक निवडून आलेल्या भाजपला मुंबईतील ३६ पैंकी ०५ विधानसभांमध्ये आपले खाते खोलता आलेले नाही. कलिना, वांद्रे पूर्व, धारावी, वरळी आणि शिवडी या पाच विधानसभांमध्ये मागील वेळेसह भाजपला खाते खोलता आले नव्हते. आणि आताही खाते त्यांना खोलता आलेले नाही. या पाचही विधानसभांमध्ये यंदा भाजपने कमळ फुलवण्याचा निर्धार केला होता. परंतु त्यांना यापैंकी एकाही विधानसभेत आपला नगरसेवक निवडून आणत कमळ फुलवता आलेले नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे १५ नगरसेवक निवडून आले आहेत. तर या पाचही विधानसभांमध्ये उबाठा आणि काँग्रेसचे आमदार असल्याने त्यांना यंदाही नगरसेवक निवडून आणण्याचे स्वप्न साकारता आलेले नाही.


तर महापालिकेतील दुसऱ्या क्रमांकाचे नगरसेवक उबाठाचे आहेत. मुंबईत उबाठाचे १० नगरसेवक आहेत. परंतु उबाठाला यंदाच्या निवडणुकीत ०९ विधानसभांमध्ये आपला एकही नगरसेवक निवडून आणता आलेला नाही. अणुशक्ती नगर, मुलुंड, शीव कोळीवाडा, घाटकोपर पूर्व, दहिसर, बोरीवली, चारकोप, मलबारहिल आणि कुलाबा या विधानसभांमध्ये उबाठाचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही. मुंबईत ठाकरे बंधूंची युती, मराठीचा मुद्दा हाती घेवून उबाठाला या दहाही विधानसभांमध्ये महायुतीने खाते खोलायला दिलेले नाही.


शिवसेनेचे मुंबईत सहा आमदार आहेत. पण या पक्षाचे २९ नगरसेवक निवडून आलेले आहेत. परंतु या पक्षाला संपूर्ण मुंबईतील १४ विधानसभांमध्ये एकही नगरसेवक निवडून आणता आलेला नाही. शिवसेना फुटल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असून मुंबईत ठाकरेंच वर्चस्व असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यनेते असलेल्या शिवसेनेला भाजपसोबतच्या युतीमध्ये किती जागा मिळतात आणि कुठल्या विधानसभांमध्ये त्यांचे वर्चस्व राहते याकडे लक्ष होते. परंतु त्यांना मुंबईतील ३६ पैंकी१४ विधानसभांमध्ये खातेही उघडता आलेले नसल्याचे दिसून येत आहे.



कोणत्या विधानसभांमध्ये कोणत्या राजकीय पक्षाला उघडता आले नाही खाते
भाजप : ०५ विधानसभा
विधानसभा : कलिना, वांद्रे पूर्व, धारावी, वरळी, शिवडी


उबाठा : ०९ विधानसभा
विधानसभा : दहिसर, बोरीवली,चारकोप, मुुलुंड, अणुशक्ती नगर, घाटकोपर पूर्व, मलबार हिल, कुलाबा, शीव कोळीवाडा


शिवसेना : १४ विधानसभा
विधानसभा : कुर्ला, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, मुलुंड, भांडुप, घाटकाेपर पश्चिम, कांदिवली, चारकोप, मालाड, माहिम, शिवडी, मलबारहिल, मुंंबादेवी, कुलाबा

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.