दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात अनधिकृतपणे जाहिरात फलक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात अनधिकृतपणे लोखंडी संरचना उभारुन जाहिरात फलक (होर्डिंग) लावल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी उत्तर’ प्रशासकीय विभागाकडून याप्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आली. तसेच, संबंधित लोखंडी संरचना आणि फलक हटवून त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. तसेच अनधिकृत फलक लावल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, अशी सक्त ताकीद मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात येत आहे.


छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील प्रवेशद्वार क्रमांक-५ च्या दोन्ही बाजूस महानगरपालिकेची परवानगी न घेता अनधिकृतपणे जाहिरात फलक (होर्डिंग) लावण्यात आले होते. सुमारे २० बाय २० फूट आकाराच्या या फलकासाठी दोन्ही ठिकाणी लोखंडी संरचना अर्थात स्टँड उभारण्यात आले होते. यासंदर्भात, ‘जी उत्तर’ प्रशासकीय विभागाकडून संबंधित जाहिरातदार अभिषेक चव्हाण यांना २९ जानेवारी २०२६ लेखी नोटीस बजावून अनधिकृत जाहिरात फलक आणि लोखंडी संरचना तत्काळ हटवण्याची सूचना देण्यात आली होती. तरीही , त्यांनी हा फलक आणि लोखंडी संरचना न हटवल्यामुळे त्यांच्याविरोधात ३० जानेवारी २०२६ रोजी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायदा, मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ३ व ४ आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३, सह कलम ३२८, ४७१ अन्वये ही कारवाई करण्यात आली. तसेच, ‘जी उत्तर’ प्रशासकीय विभागातील परवाना विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हटवण्याची कारवाई करत या फलक आणि लोखंडी संरचनेचे साहित्य जप्त केले.



संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करणार


जाहिरातदार तसेच संबंधितांनी सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे जाहिरात फलक (होर्डिंग) लावून विद्रुपीकरण करु नयेत. अन्यथा, संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याप्रकरणी कोणतीही हयगय केली जाणार नाही. तसेच, अनधिकृत जाहिरात फलकांविरोधात कारवाई नियमितपणे सुरूच राहील. - विनायक विसपुते सहायक आयुक्त (जी उत्तर)

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने